भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी दिंकली असली तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजआधी रोहितची कॅप्टन्सी काढून गिलला कर्णधार करण्यात आलं, पण आता गिल दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या शेवटच्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अय्यर अजूनही फिट झाला नसल्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार?
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 56 सामन्यांमध्ये 42 विजय मिळवले आहेत, पण 2027 वर्ल्ड कप लक्षात घेता निवड समिती रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सी देण्याची शक्यता कमी आहे. तसंच रोहित शर्मा स्वतः स्टँड-इन कर्णधार म्हणून हा प्रस्ताव स्वीकारणंही कठीण आहे. निवड समितीसमोर विराट कोहलीचाही पर्याय आहे, तसंच त्याचा कॅप्टन्सी रेकॉर्डही चांगला आहे, पण विराटने 2021 नंतर टीमचं नेतृत्व केलेलं नाही. निवड समिती आणि बीसीसीआय रोहितप्रमाणेच विराटचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.
केएल राहुल करणार नेतृत्व?
गिल फिट झाला नाही तर यशस्वी जयस्वाल ओपनर म्हणून गिलची जागा घेईल, तर श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला संधी मिळू शकते. गिलच्या गैरहजेरीत ऋषभ पंत टेस्ट टीमचं नेतृत्व करणार असला, तरी पंतला वनडे टीमची कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वनडे सीरिजसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, या परिस्थितीमध्ये केएल राहुल हा कॅप्टन्सीसाठी एकमेव पर्याय उरतो.
कधी होणार वनडे सीरिज?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना 6 डिसेंबरला होईल. या तीन वनडे रांची, रायपूर आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जाणार आहेत. वनडे सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.
