रोहित शर्मा आणि विराट कोहली गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळले होते.ही मालिका भारताने 2-0ने खिशात घातली होती. ही मालिका रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शेवटची असेल असे बोलले जात होते. पण दोन्ही सिनिअर खेळाडूंनी ज्या प्रमाणे खेळी केली, ती पाहता ते आणखीण काही काळ भारतासाठी खेळू शकतात.
advertisement
दरम्यान आता ऑस्ट्रेलिया नंतर आता साऊथ आफ्रिका भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात साऊथ आफ्रिका भारतासोबत सध्या टेस्टचे सराव सामने खेळते आहे. त्यानंतर वनडेचे सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का? असा मोठा प्रश्न होता. पण आता रोहित शर्मा आणि विराट कोहली साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे फॉरमॅटमध्ये सराव सामने खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित आणि विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले. या मालिकेत दोघांची कामगिरी खूप चांगली झाली होती.रोहित मालिकावीर होता.रोहित पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत रोहितने 73 आणि 121 धावा केल्या. तर विराटने तिसऱ्या सामन्यात (नाबाद 74) चांगली कामगिरी केली होती, तर पहिल्या दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
वनडे मालिका या क्वचितच होत असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फॉर्म टीकवून ठेवण्यासाठी सराव सामने खेळणे अपेक्षित होते.पण दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी आहे.भारत अ संघ 13,16 आणि 19 नोव्हेंबर रोजी राजकोटमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळेल.या सराव सामन्यात दोन वरिष्ठ क्रिकेटपटू संघात असण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एक किंवा दोन दिवसांत भारत अ संघाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे परंतु निवडकर्त्यांकडे तीन सामन्यांसाठी काही योजना आहेत आणि ते या सामन्यांसाठी दोन्ही अनुभवी खेळाडूंना निवडण्याची शक्यता नाही.
गतविश्व कसोटी अजिंक्यपद विजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन कसोटी सामने १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे आणि २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी येथे खेळले जातील. कसोटी मालिकेनंतर आठ व्हाईट-बॉल सामने होतील, ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामने असतील, ज्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड स्वाभाविकपणे केली जाईल.
