India vs South Africa Odi : येत्या 30 नोव्हेंबर 2025 भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे.या मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेने वनडे संघाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता टीम इंडियाने वनडे संघाची घोषणा केली आहे. या संघात मराठमोळ्या खेळाडूची एंन्ट्री झाली आहे. या खेळाडूने साऊथ आफ्रिकेविरूद्ध सराव सामन्यात उत्कृष्ट खेळी केली होती.त्याचच बक्षीस आता त्याला मिळालं आहे.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाड हा मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. तसेच त्याला दुखापत झाल्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून लांब होता.पण दुखापतींनंतर कमबॅक करताना ऋतुराजने एक शानदार शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. पहिल्या सामन्यात ऋतुराजने 129 बॉलमध्ये 117 रन केले, ज्यात 12 फोरचा समावेश होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 9 फोरच्या मदतीने 83 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले.
भारताने सीरिजमधले दोन सामने जिंकले आणि दोन्ही विजयांमध्ये ऋतुराज गायकवाडने उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या कामगिरीनंतर ऋतुराजची टीम इंडियात कमबॅक होईल असे बोललं जातं होतं आणि आता त्याची टीम इंडियात निवड झाली आहे.
ऋतुराजने भारतासाठी शेवटचा टी20 सामना हा झिम्बाब्वेसोबत 13 जुलै 2024 ला खेळला होता.त्यानंतर आता 498 दिवसांनी त्याची टीम इंडियात एंन्ट्री झाली आहे. विशेष म्हणज ऋतुराज गायकवाडची टीम इंडियात एंन्ट्री झाल्याने आता तो रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरणा आहे.
दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेट कीपर), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
