India A vs South Africa A : भारत अ आणि साऊथ आफ्रिका अ यांच्यात दुसरा सराव टेस्ट सामना सूरू आहे. या सराव सामन्यात पहिल्याच दिवशी टीम इंडियाच टॉप ऑर्डर फ्लॉप ठरलं आहे. कारण ज्या खेळाडूंची टेस्ट सामन्यासाठी निवड झाली होती, तेच खेळाडू फेल ठरले आहेत. पण ते जरी फेल ठरले असले तरी तो एकटाच भिडला आणि भारताचा डाव संपेपर्यंत तो शतक ठोकून नाबाद राहिला होता. त्यामुळे त्याच्या खेळीच्या बळावर टीम इंडिया 200 पार धावा करू शकली आहे.
advertisement
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना के एल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन मैदानात उतरले होते.पण ईश्वरन शुन्यावर बाद झाला होता. त्याच्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला होता. पण तो स्थिरावण्या आधीच राहुल 19 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर सुदर्शनही फार काळ मैदानावर टीकला नाही आणि 17 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर देवदत्त पड्डीकल 5 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे भारताचे एका मागून एक विकेट पडत होते.
यानंतर कर्णधार रिषभ पंतची मैदानात एंन्ट्री झाली. त्याच्यासोबत ध्रुव जूरेल मैदानात होता. दोघेही भारताचा डाव सावरतील असे वाटत असताना रिषभ पंत 24 वर बाद झाला. रिषभ पंतनंतर विकेटची रांग लागतच होती. पण या सर्वांत ध्रुव ज्यूरेल भारताचा एका बाजूने डाव सारवून होता.या दरम्यान त्याने आपलं शतकही पुर्ण केलं होतं.
त्यामुळे के एल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पड्डीकल , रिषभ पंत सारखे टॉर ऑर्डर साऊथ आफ्रिकेसमोर फेल ठरले तिकडे ध्रुव जुरेल एकटा भिडला. पुढे जाऊन भारत 255 धावांवर ऑल आऊट झाला. या दरम्यान ध्रुव जुरेल 132 धावांवर नाबाद राहिला.या दरम्यान त्याने 4 षटकार आणि 12 चौकार मारले आहेत.
साऊथ आफ्रिकेकडून तिआन वॅन वूरेने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. टेश्पो मेरेकी आणि प्रेणेयल सुब्रायेनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. या व्यतिरीक्त ओकुही सेलेने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. दरम्यान टीम इंडिया 255 धावांवर ऑल आऊट झाल्याने काहीशी बॅकफुटवर गेली आहे. आता टीम इंडिया या सामन्यात कसं कमबॅक करत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
