काय म्हणाला जडेजा?
'मला बॉलिंगची आणखी संधी मिळायला हवी होती. पण आम्ही टीम म्हणून चांगली कामगिरी केली. मागच्या 5-6 महिन्यांपासून आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत, त्यावर आम्ही आनंदी आहोत', अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.
गंभीरने जडेजाला दिली मोठी जबाबदारी
'गौतम गंभीरने मला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे मी बॅटर म्हणून विचार करत आहे. मी सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला येतो, त्यामुळे मी शुद्ध बॅटरसारखा विचार करतो. मागच्या काही वर्षांपासून मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळायचो, त्यामुळे माझे विचार थोडे वेगळे होते. मी क्रीजवर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. मी रेकॉर्डबद्दल फार विचार करत नाही, मी फक्त टीमसाठी चांगलं योगदान द्यायचा प्रयत्न करतो', असं वक्तव्य जडेजाने केलं आहे.
advertisement
तिसऱ्यांदा प्लेअर ऑफ द सीरिज
रवींद्र जडेजाने त्याच्या टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार मिळवला आहे. 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाने पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळवला होता, त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच जडेजाला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. आता वेस्ट इंडिजविरुद्ध जडेजाने या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये जडेजाला एकदाच बॅटिंगची संधी मिळाली, ज्यात त्याने 104 रन केल्या. याशिवाय त्याने बॉलिंगमध्ये 8 विकेटही घेतल्या. पहिल्या सामन्यात जडेजाला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वेळा जडेजाला हा पुरस्कार मिळाला आहे. रवींद्र जडेजा हा टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये नंबर वन ऑलराऊंडर आहे.