टेस्ट करिअरमधील 11 वं शतक
केएल राहुलने आपल्या टेस्ट करिअरमधील 11 वं शतक झळकावत भारतीय टीमला वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी बढत मिळवून दिली. यापूर्वी, पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक बॉलिंगमुळे वेस्ट इंडिजची टीम फक्त 162 रन्सवर ऑलआउट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत 218 धावा केल्या आहेत.
advertisement
केएल राहुलचा उत्कृष्ट फॉर्म कायम
इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून टेस्ट सिरीजमध्ये पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. त्याने ज्या प्रकारे इंग्लिश टीमविरुद्ध खेळ केला होता, त्याच रंगात तो अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना दिसला. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल बाद झाल्यावर त्याने कॅप्टन शुभमन गिलसोबत इनिंग सांभाळली. एका बाजूला पाय रोवून उभा राहत त्याने वेस्ट इंडिजच्या बॉलर्सना जोरदार बाउंड्री पार पोहोचवले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये केएल राहुलने 101 बॉल्सचा सामना करून 6 फोरसह आपली फिफ्टी पूर्ण केली आणि 53 रन्सवर नॉटआउट परतला. दुसऱ्या दिवशी फोर मारत त्याने आपल्या टेस्ट करिअरमधील 11 वे शतक पूर्ण केले. केएल राहुलने डिसेंबर 2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट शतक झळकावले होते. त्यानंतर तो भारतात हा पराक्रम पुन्हा करू शकला नव्हता, जो त्याने आता संपवला.
चार टेस्ट मॅचमधील दुसरी सेंच्युरी
दरम्यान, केएल राहुलची ही गेल्या चार टेस्ट मॅचमधील दुसरी सेंच्युरी आहे. यापूर्वी त्याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्यानंतर तो मँचेस्टरमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये 90 रन्सवर आउट झाला. ओव्हलमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता अहमदाबादमध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याने शतक झळकावले आहे. रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यापूर्वी संन्यास घेतल्यानंतर त्याला ओपनिंगमध्ये संधी मिळाली होती आणि या संधीचा फायदा घेत केएलने टीममधील आपले स्थान पक्कं केलं आहे.