TRENDING:

KL Rahul : टीम इंडियाची निवड झाली, पण गिल टेन्शनमध्ये, केएल राहुलने अचानक सोडलं मैदान!

Last Updated:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे, पण टीमची निवड झाल्यानंतर काही तासांमध्येच टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे, पण टीमची निवड झाल्यानंतर काही तासांमध्येच टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात दोन अनधिकृत टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जात आहे, पण या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार खेळाडू केएल राहुल मॅच सोडून अचानक मैदानाबाहेर गेला आहे. शेवटच्या इनिंगच्या वेळी राहुलला बाहेर जावं लागलं.
टीम इंडियाची निवड झाली, पण गिल टेन्शनमध्ये, केएल राहुलने अचानक सोडलं मैदान!
टीम इंडियाची निवड झाली, पण गिल टेन्शनमध्ये, केएल राहुलने अचानक सोडलं मैदान!
advertisement

केएल राहुलला अचानक काय झाले?

टीम इंडिया या सामन्यात विजयासाठी 412 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी इंडिया ए ने 2 विकेट गमावून 169 रन केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला. चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असलेल्या राहुलला फिजिओसोबत मैदान सोडून बाहेर जावं लागलं.

समोर आलेल्या माहितीनुसार केएल राहुलला ताप आला होता, पण तरीही त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग सुरू केल्यानंतर राहुलला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तो रिटायर हर्ट झाला. मैदानाबाहेर गेला तेव्हा राहुल 92 बॉलमध्ये 74 रनवर खेळत होता, यात त्याने एकूण 9 फोर मारल्या होत्या. केएल राहुलची वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

advertisement

मॅच रोमांचक टप्प्यावर

इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील हा सामना रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी टीम इंडियाला विजयासाठी आणखी 243 रन हव्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आणखी 8 विकेटची गरज आहे. केएल राहुल सध्या रिटायर हर्ट झाला आहे, त्यामुळे टीमला गरज पडली तर तो पुन्हा बॅटिंगला येऊ शकतो.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KL Rahul : टीम इंडियाची निवड झाली, पण गिल टेन्शनमध्ये, केएल राहुलने अचानक सोडलं मैदान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल