अखेर बेन स्टोक्सने हत्यार टाकलं
पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सेशनमध्ये इंग्लंडला सहा विकेट्स घेण्याची गरज होती. अखेरच्या दोन तासात टीम इंडियाला फक्त विकेट टिकवण्याची गरज होती. दोन तासापैकी दीड तास जरी टीम इंडिया मैदानात पाय रोवून थांबली तरी देखील मॅच ड्रॉ झाली असली. झुंजार खेळी करत दीड तास जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी विकेट टाकली नाही. अखेर दीड तासानंतर बेन स्टोक्सने हत्यार टाकलं. त्यावेळी हॅडशेक करण्यासाठी बेन स्टोक्स समोर आला पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामना कॉल ऑफ करायला नकार दिला. ड्रेसिंग रुममधून तसे आदेश आले होते.
advertisement
इंग्लंडची ऑफर पण जडेजाचा स्पष्ट नकार
खरं तर जडेजा आणि वॉशिंग्टन शतकाच्या जवळ होते. जडेजा 90 तर वॉशिंग्टन सुंदर 82 धावांवर खेळत होता. त्यावेळी शतक पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाने दीड दिवस फिल्डिंग करणाऱ्या इंग्लंडला झुंजवलं. बेन स्टोक्स यावेळी संपाल्याचं पहायला मिळाला. त्याने जडेजाजवळ जात विनंती केली पण जडेजाने स्पष्ट नकार देत इंग्लंडला बॉलिंग करायला भाग पाडलं. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अंदाजात शतक साजरं केलं.
गौतम गंभीर म्हणतो...
इंग्लंड संघाच्या नाराजीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'जर तुमचा एक खेळाडू 90 धावांवर असेल आणि दुसरा 85 धावांवर असेल, तर ते शतकाच्या पात्रतेचे नाहीत का? जर इंग्लंडचा एखादा खेळाडू 90 धावांवर असेल आणि त्याच्या पहिल्या शतकाच्या इतक्या जवळ असेल, तर त्याला त्याचे शतक पूर्ण करण्याची संधी दिली जाऊ नये का? ते ते कसे घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे', असं गौतम गंभीर म्हणाला.