TRENDING:

Vaibhav Suryavanshi : टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार, वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

आयपीएल 2026 सुरू असतानाच टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 सुरू असतानाच टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. दोन वर्षांनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. मागच्या काही काळापासून झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक झाली होती, पण नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुपर-8 मध्ये प्रवेश केला.
टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार, वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार? समोर आली मोठी अपडेट
टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार, वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार? समोर आली मोठी अपडेट
advertisement

आता जुलै महिन्यात झिम्बाब्वे भारताविरुद्ध 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजचे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जाणार आहेत. याआधी 2024 साली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता, तेव्हा भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 5 टी-20 मॅच खेळल्या होत्या. आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 23 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै अशा 3 मॅच होणार आहेत.

advertisement

वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार?

आयपीएल 2026 च्या या मोसमात पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध 15 बॉलमध्ये वादळी अर्धशतक ठोकलं, यानंतर वैभवची टीम इंडियात निवड व्हावी, अशी मागणी केली जात आहे. जगभरातले दिग्गज क्रिकेटपटूही वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड केली जावी, अशा प्रतिक्रिया देत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खरकट्या मारुती? पुणेकरांनी असं का दिलं नाव? 100 वर्ष जुनं आहे ठिकाण!
सर्व पहा

झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडिया युवा खेळाडूंना पाठवू शकते. टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय खेळाडू आयपीएल खेळत आहेत, यानंतर लगेचच भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यावर सीनियर खेळाडूंना आराम देऊन युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना पाठवलं जाणार असेल तर मग निवड समिती वैभव सूर्यवंशीचा विचार करण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार, वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार? समोर आली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल