बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठ्या चुका
टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी संघात सध्या भलतेच प्रयोग सुरू असल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाने भलेही मालिकेत दोन सामने जिंकले आहे. पण गंभीरची प्लॅनिंग आणि सूर्याचे निर्णय चुकीचे ठरत असल्याचं पहायला मिळतंय. चौथ्या टी-ट्वेंटीमध्ये देखील टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ठेपाळल्याचं पहायला मिळालं. सूर्याने बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठ्या चुका केल्या. रोहितला जे जमलं ते सूर्याला जमत नसल्याचं क्रिडातज्ज्ञांचं म्हणणं आहे.
advertisement
गंभीरची चक्रावणारी बॅटिंग ऑर्डर
काल बॅटिंग ऑर्डरमध्ये सूर्यकुमारच्या जागी शिवम दुबे याला वन डाऊनला पाठवण्यात आलं, तो तिसऱ्या सामन्यात नंबर 8 वर खेळला होता. तर सूर्या आणि तिलक यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. तसेच जितेश शर्माला प्रमोशन दिलं अन् त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवलं, जो तिसऱ्या सामन्यात सुंदर नंतर सातव्या क्रमांकावर खेळायला आला होता. तसेच बिग हिटर अक्षर पटेल याला पाचव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर पाठवलं. त्यामुळे टीम इंडियाची स्कोर 200 पर्यंत धावला नाही.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची प्लॅनिंग
दरम्यान, टीम इंडियामध्ये सध्या कोणता खेळाडू फिट बसतोय अन् कोणता नाही? याची चाचपणी गंभीर अँड कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया सारख्या स्ट्रॉग टीमविरुद्ध प्रयोग करण्याची संधी गंभीर सोडत नाहीये. जर एखादी बॅटिंग ऑर्डर ऑस्ट्रेलियाला संकटात टाकू शकते तर तो पर्याय सूर्यकुमार यादव आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आमलात आणेल.
