मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या फायनल सामन्यात खेळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये 9 पैकी 9 साखळी सामने जिंकले असून यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ पॉईंट टेबलमध्ये 9 पैकी 5 सामने जिंकून चौथ्या स्थानी आहे.
advertisement
Harbhajan Singh : हरभजन इस्लाम स्वीकारणार होता? इंझमामवर भडकला भज्जी; म्हणाला, ही कोणती नशा
टीम इंडियाचा संघ सध्या फॉर्मात असल्याने कॅप्टन रोहित शर्माने यात कोणतेही बदल केलेले नाहीत. तर न्यूझीलंड संघाने देखील टीम इंडियाला सेमी फायनल सामन्यात तगडी झुंज देण्यासाठी टीममध्ये बदल केलेले नाहीत.
टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन , डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम , मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट