अल्झारी जोसेफला काहीच दिवसांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे ग्रासलं आहे, त्यामुळे तो या सीरिजला मुकणार आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडियाद्वारे जोसेफ सीरिजबाहेर झाल्याची माहिती दिली. जोसेफच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याचं निष्पन्न झालं आहे, असं क्रिकेट वेस्ट इंडिजने सांगितलं आहे.
अल्झारी जोसेफच्या गैरहजेरीमध्ये वेस्ट इंडिजने 23 वर्षांच्या जेडिया ब्लेड्सला टीममध्ये सामील केलं आहे. ब्लेड्सने अद्याप टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण त्याने 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ब्लेड्स सध्या नेपाळविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये खेळत आहे, त्यानंतर तो भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये सामील होईल.
advertisement
अल्झारी जोसेफला दुखापत झाल्यामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजने आधी ऑलराऊंडर जेसन होल्डरसोबत संपर्क साधला होता, पण मेडिकल टेस्ट सुरू असल्यामुळे होल्डरने खेळायला नकार दिला.
भारत-वेस्ट इंडिज सीरिजचं टाईम टेबल
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टेस्ट मॅच 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सीरिजची दुसरी आणि शेवटची टेस्ट 10 ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळली जाईल.
भारतीय टीम
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन (विकेट कीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
वेस्ट इंडिजची टीम
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केवलन अँडरसन, अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, टेगेनारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेविन इमलाच, जेदिदिया ब्लेड्स, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे आणि जेडेन सील्स