चीनमध्ये झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यापासून चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाचा या स्पर्धेत किती दबदबा होता, याचा अंदाज स्कोअरकार्डवरून लावता येईल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा 16-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर सिंगापूरचा 16-1 आणि बांगलादेशचा 12-0 असा पराभव झाला. भारताने गट फेरीतच जपानचा 4-2 आणि पाकिस्तानचा 10-10-2 असा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत जपानचा 5-1 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे चौथे सुवर्णपदक आहे. याआधी 2014 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्ण यश मिळविले होते.
advertisement
मनप्रीतचा पहिला गोल
भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानविरुद्ध पहिला गोल केला. मनप्रीत सिंगने अप्रतिम खेळ दाखवत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जपानने या गोलवर रिव्यू घेतला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनप्रीत सिंगनंतर हरमनप्रीत सिंगने गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली.
वाचा - 2023 च्या वर्ल्ड कपला सुरुवात! वाचा टीम इंडियाचा ड्रेस कोणत्या फॅब्रिकपासून बनतो?
अमित रोहदास आणि अभिषेक यांचेही गोल
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा गोल केला. यावेळी अमित रोहिदासने मैदानी गोल करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. काही वेळानंतर अभिषेकने भारतीय संघासाठी चौथा गोल केला. यासह भारतीय संघ 4-0 ने पुढे गेला. चार गोलने पिछाडीवर पडल्यानंतर जपानने एक गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र, 4-1 असा विजय भारतीय संघाला बहुधा मान्य नव्हता. टीम इंडियाने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला गोल करत 5-1 असा विजय मिळवला.