भविष्यात सुधारणा करण्यासाठी...
पराभवानंतर बोलताना पंत म्हणाला की, "हा निकाल थोडा निराशाजनक आहे." त्याने सांगितले की, आम्ही यातून लर्निंग घेऊन एकजूट राहायला हवे. विरोधी संघाने मालिकेत वर्चस्व गाजवले, पण तरीही तुम्ही त्यांच्या कामगिरीला गृहीत धरू शकत नाही. भविष्यात सुधारणा करण्यासाठी ऋषभने माइंडसेट स्पष्ट ठेवण्यावर जोर दिला. तसेच साऊथ अफ्रिकन बॉलर्सने चांगली बॉलिंग केली, त्यामुळे आम्हाला सामन्यातून पराभव स्विकारावा लागला, असंही ऋषभ पंत म्हणाला आहे.
advertisement
आम्ही ते करू शकलो नाही... - ऋषभ
ऋषभ पंतने मान्य केलं की, 'त्यांनी आमच्यापेक्षा निश्चितच चांगलं क्रिकेट खेळले. क्रिकेटची मागणी असते की, तुम्हाला एक टीम म्हणून मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा उठवावा लागतो.' तो म्हणाला की, आम्ही ते करू शकलो नाही आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण मालिका गमवावी लागली. या मालिकेतून आम्ही आमच्या प्लान वर लक्ष केंद्रित करणं ही सकारात्मक गोष्ट घेऊ, असंही पंतने शेवटी स्पष्ट केलं आहे.
सात सामन्यांतील भारताचा पाचवा पराभव
दरम्यान, एकेकाळी भारताला घरच्या मैदानावर हरवणे कठीण वाटायचे. पण आता असे दिसते की भारताचा अजिंक्य किल्ला मोडला गेला आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांना क्लीन क्लीन केले आहे. गेल्या 66 वर्षांत घरच्या मैदानावर सात सामन्यांतील भारताचा हा पाचवा पराभव आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये मालिका 0-2 ने गमावल्यानंतर भारताला पॉइंट टेबलमध्ये मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्ताननंतर भारत पाचव्या स्थानावर घसरला आहे.
