सायना म्हणाली की तिला कधीही अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करण्याची गरज वाटली नाही कारण तिला वाटले की तिच्या अनुपस्थितीमुळे सर्व काही स्पष्ट होईल. ती म्हणाली, "हळूहळू, लोकांना समजेल की सायना खेळत नाही. मला वाटत नाही की माझी निवृत्ती जाहीर करणे ही एक मोठी समस्या आहे. मला वाटले की माझी वेळ आली आहे कारण मी स्वतःला जास्त दबाव आणू शकत नाही. माझा गुडघा त्या स्थितीत नाही."
advertisement
सायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खीळ बसली होती. त्यावेळी तिला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. तरीही जिद्दीने पुनरागमन करत तिने 2017 मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. मात्र, ही दुखापत पुन्हा पुन्हा उफाळून येत होती, ज्यामुळे तिला सरावात अडचणी येत होत्या.
2024 मध्ये सायनाने एक धक्कादायक खुलासा केला होता. तिला गुडघ्याचा संधिवात (आर्थराइटिस) असून त्यातील कार्टिलेज पूर्णपणे घासले गेले आहे. अशा परिस्थितीत बॅडमिंटनसारख्या वेगवान खेळात टिकून राहणे तिच्यासाठी अशक्य झाले होते. "मी माझ्या अटींवर खेळात आले आणि स्वतःच्याच निर्णयाने बाहेर जात आहे," असे भावनिक उद्गार तिने यावेळी काढले.
