TRENDING:

Manu Bhaker : मनू भाकरने रचला इतिहास, ऑलिम्पिक नेमबाजीत भारताला जिंकून दिल कांस्यपदक

Last Updated:

मनू ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा सुरु असून यात मनू भाकरने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकच पहिलं वहील पदक जिंकून दिल आहे. मनू भाकरने महिला नेमबाजीत कांस्य पदकाची कमाई केली असून तिने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह हे पदक मिळवलं आहे. मनू ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे.
मनू भाकर
मनू भाकर
advertisement

अवघ्या 22 व्या वर्षी मनू भाकर हिने हे यश मिळवलं असून तीच सर्व स्थरातून कौतुक केलं जात आहे. मनूला रौप्य पदक मिळवण्याची संधी थोडक्यात हुकली. 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्ण पदक मिळवलं. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावलं. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाळी. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे 243.2 आणि 241.3 असा स्कोअर केला. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त 2 चा फरक होता. तर मनूने 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदकाला गवसणी घातली.

advertisement

Paris Olympics 2024 : मागच्या ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल तुटलं; यंदा लक्ष्य भेदलं, भारताच्या मनूने इतिहास घडवला

2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने पदार्पण केले होतं. मात्र तेव्हा मनु अपयशी ठरली होती. मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावं लागल्याने तिचं आव्हान संपुष्टात आलं. यावेळी तिच्या पिस्तुलात बिघाड झाला होता ज्यामुळे तिला केवळ 14 शॉट मारता आले. मात्र मनूने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार कमबॅक करून भारतासाठी पदकाची कमाई केली आहे.

advertisement

नेमबाजीत पदक मिळवणारी पहिली महिला :

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2004 मध्ये राज्यवर्धन राठोडने रौप्य, 2008 मध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण तर 2012 मध्ये गगन नारंग आणि विजय कुमारने सिलव्हर मेडल मिळवलं होतं. तर आता मनू भाकरने अनेक वर्षांचा दुष्काळ दूर करून नेमबाजीत मेडल मिळवलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Manu Bhaker : मनू भाकरने रचला इतिहास, ऑलिम्पिक नेमबाजीत भारताला जिंकून दिल कांस्यपदक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल