TRENDING:

IPL 2024 : पहिल्याच सामन्यात शिखर धवनचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव फलंदाज

Last Updated:

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने फलंदाजी करताना मोठा पराक्रम केला जो करणे आजतागायत कोणत्याही खेळाडूला करणे शक्य झाले नव्हते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगप्रसिद्ध टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. आयपीएल 2024 मधील दुसरा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने फलंदाजी करताना मोठा पराक्रम केला जो करणे आजतागायत कोणत्याही खेळाडूला करणे शक्य झाले नव्हते.
शिखर धवन
शिखर धवन
advertisement

पंजाबच्या मुल्लनपूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. या दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने 22 धावा करताना 4 चौकार लगावले.

IPL 2024 : विराट पासून धोनीपर्यंत, सेलिब्रेटीजचे केसं कापणारा 'हा' हेअर स्टायलिस्ट कोण? किती घेतो फी?

advertisement

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ठोकलेल्या 4 चौकारांच्या मदतीने शिखर धवनने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बाउंड्रीज ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. शिखर धवनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 745 चौकार आणि 148 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे धवनने ठोकलेल्या बाउंड्रीजची एकूण संख्या 902 इतकी झाली असून त्यामुळे आयपीएलमध्ये 900 हून अधिक बाउंड्रीज मारणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. शिखर धवन मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे परंतु आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

advertisement

शिखर धवनने आयपीएलमध्ये 902 बाउंड्रीज केल्या असून या यादीत दुसरा क्रमांक विराट कोहली याचा आहे. विराट कोहलीने 878 बाउंड्रीज मारल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर 877 बाउंड्रीज सह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. तसेच या यादीत चौथ्या क्रमांकावर 811 बाउंड्रीज सह रोहित शर्मा असून पाचव्या क्रमांकावर 761 बाउंड्रीज मारणारा ख्रिस गेल आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : पहिल्याच सामन्यात शिखर धवनचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव फलंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल