IPL 2024 : विराट पासून धोनीपर्यंत, सेलिब्रेटीजचे केसं कापणारा 'हा' हेअर स्टायलिस्ट कोण? किती घेतो फी?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आयपीएल 2024 पूर्वी विराट कोहली आणि एम एस धोनी या स्टार क्रिकेटर्सचे नवीन लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यात विराट आणि धोनीच्या हेअरस्टाईलला लोकांनी खूप पसंत केले. तेव्हा बड्या सेलिब्रिटीजचे हेअर स्टाईल करणारा अलीम हकीम नेमका कोण आहे याबाबत अनेक लोकांना जाणून घ्यायचे आहे.
advertisement
अलीम हकीमचे वडील हकीम कैरनवी यांचे मुंबईतील भेंडी बाजारात लहानसे दुकान होते, परंतु त्यांची वेगळी स्टाईल पाहून अमिताभ बच्चन, सुनील दत्त, मेहमूद यांसारखे अनेक कलाकार त्यांच्याकडे केस कापायला यायचे. परंतु हकीम कैरन यांचे अल्पकाळात निधन झाले त्यामुळे वयाच्या 9 व्यावर्षी अलीम हकीमने हातात कैची घेऊन वडिलांचा व्यवसाय पुढे नेला.
advertisement
advertisement
advertisement
आज बॉलिवूडमधील रजनीकांत, संजय दत्त, सुनील शेट्टी, सलमान खान, रणवीर सिंग, हृतिक रोशन, कतरिना कैफ, जूनियर एनटीआर, महेश बाबू, यश, राम चरण, विजय देवरकोंडा, रितेश देशमुख इत्यादी अनेक स्टार कलाकार त्याचे क्लायंट्स आहेत. तर क्रिकेटमधील विराट कोहली, धोनी, हार्दिक पंड्या इत्यादी स्टार खेळाडूंचा तो हेअर स्टायलिस्ट आहे. केस कापण्यासाठी अलीम हकीम हजार, लाखांमध्ये फी घेतो.