advertisement

Video : प्रजासत्ताक दिनी 'तो' एक सेकंदाचा गोंधळ आणि.... UPSC टॉपर IAS टीना डाबीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Last Updated:

देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी आणि बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी (Tina Dabi) यांच्याकडून एक अशी चूक झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला आहे.

IAS टिना डाबी
IAS टिना डाबी
मुंबई : आयुष्यात आपण कितीही यशस्वी झालो, अगदी देशातील सर्वात कठीण मानली जाणारी 'यूपीएससी' परीक्षा टॉपर म्हणून उत्तीर्ण झालो तरी, कधीकधी एक छोटीशी चूक आपल्याला सोशल मीडियाच्या टीकेचा धनी बनवू शकते. शिस्त, नियम आणि प्रोटोकॉल ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य अंगं असतात. विशेषतः 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांना जेव्हा एखादा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतो, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा त्यांच्याकडे असतात. अशाच एका महत्त्वाच्या प्रसंगी, देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी आणि बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी (Tina Dabi) यांच्याकडून एक अशी चूक झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला आहे.
नेमकं काय घडलं?
26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाडमेर जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी म्हणून टीना डाबी यांनी तिरंग्याची दोरी खेचली आणि राष्ट्रध्वज फडकवला. मात्र, ध्वज फडकवल्यानंतर नेमक्या कोणत्या दिशेला तोंड करून मानवंदना (Salute) द्यायची, याबाबत त्या काही क्षणांसाठी गोंधळलेल्या दिसल्या.
सुरक्षारक्षकाचा तो 'इशारा' अन् व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, टीना डाबी ध्वज फडकवल्यानंतर चुकीच्या दिशेला वळू लागल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हे तातडीने लक्षात आलं. त्या रक्षकाने हळूच हाताने इशारा करून मॅडमला योग्य दिशा सांगितली आणि मग त्यांनी वळून तिरंग्याला सॅल्युट केला. हा काही सेकंदांचा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
advertisement
नेटकऱ्यांनी लावली 'क्लास'
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर या व्हिडिओवर संतप्त आणि टिका करायला सुरुवात केली.
@CuteAar:uhi4 नावाच्या युजरने लिहिले, "ह्या आहेत बाडमेरच्या डीएम टीना डाबी, ज्या यूपीएससी टॉपर आहेत. पण मॅडम हेच विसरल्या की सॅल्युट कुठे करायचा आहे. कदाचित त्यांना कॅमेऱ्याची इतकी सवय झाली आहे की, जिथे कॅमेरा दिसतो तिकडेच त्या वळतात."
advertisement
तर दुसऱ्या एका युजरन म्हटले की, "जेव्हा अधिकारी 'रील स्टार' बनतात, तेव्हा प्रोटोकॉलचं भान राहत नाही."
टीना डाबी या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या घटनेनंतर इंटरनेटवर एक नवीन वाद सुरू झाला आहे. काहींच्या मते, इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा मूलभूत प्रोटोकॉलची चूक होणे अपेक्षित नाही. तर दुसरीकडे, त्यांचे समर्थक असे म्हणत आहेत की, माणूस म्हटला की चूक होऊ शकते आणि तो केवळ काही सेकंदांचा गोंधळ होता.
advertisement
advertisement
प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे रोल मॉडेल असतात. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी छोटीशी चूकही मोठी मानली जाते. टीना डाबी यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याकडून झालेली ही चूक त्यांना आता महागात पडताना दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Video : प्रजासत्ताक दिनी 'तो' एक सेकंदाचा गोंधळ आणि.... UPSC टॉपर IAS टीना डाबीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement