advertisement

Walking Barefoot : काय सांगता! घरात चप्पल न घालता फिरणंही ठरू शकतं आजारांचं कारण, वाचा दुष्परिणाम

Last Updated:

Walking barefoot at home health risks : घराच्या आत बहुतेक लोक अनवाणी चालणे पसंत करतात. काहींना ते आरामदायक वाटते, तर काही जण याला भारतीय परंपरा किंवा स्वच्छतेशी जोडून पाहतात. विशेषतः वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढल्यानंतर लोक दिवसभर घरात बूट-चप्पल न घालताच चालत-फिरत राहतात.

घरी अनवाणी चालण्याचे तोटे
घरी अनवाणी चालण्याचे तोटे
मुंबई : अनेक लोक स्वच्छतेच्या नावाखाली घराबाहेरच बूट-चप्पल काढतात. लोकांना वाटते की, असे केल्याने घर स्वच्छ राहील आणि अनवाणी फिरणे सोयीचे ठरेल. घराच्या आत बहुतेक लोक अनवाणी चालणे पसंत करतात. काहींना ते आरामदायक वाटते, तर काही जण याला भारतीय परंपरा किंवा स्वच्छतेशी जोडून पाहतात. विशेषतः वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढल्यानंतर लोक दिवसभर घरात बूट-चप्पल न घालताच चालत-फिरत राहतात. तुम्हीही असे करत असाल तर सावध राहणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, घरातही दीर्घकाळ अनवाणी चालणे पाय, सांधे आणि मणक्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही सवय हळूहळू अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकते.
टाइम मॅगझिनच्या अहवालानुसार, घराचा फरशी दिसायला कितीही स्वच्छ वाटत असला तरी त्यावर बॅक्टेरिया, फंगस आणि जंतू असू शकतात. विशेषतः बाथरूम आणि किचनजवळ ओलावा जास्त असतो, जो फंगल इन्फेक्शन वाढवतो. अनवाणी चालल्यामुळे अ‍ॅथलीट्स फुट, खाज, दाद, टाचांना भेगा पडणे आणि त्वचेची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांच्या पायांवर आधीपासूनच काप, भेगा किंवा जखमा आहेत, त्यांच्यासाठी संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, कधी किचनमध्ये उभे राहून स्वयंपाक करणे, कधी जिने चढणे-उतरणे, तर कधी साफसफाई किंवा कपडे धुताना अनेक लोक अनवाणीच असतात. या सर्व क्रिया कडक फरशीवर कोणताही सपोर्ट न घेता केल्या जातात. अशा वेळी पायाखालील फॅट पॅडवरच संपूर्ण धक्का सहन करावा लागतो. सतत दाब पडल्याने सूज, वेदना आणि थकवा वाढत जातो, जो पुढे मेटाटार्साल्जिया आणि प्लांटर फॅसिआयटिससारख्या समस्यांमध्ये बदलू शकतो.
advertisement
डायबिटीज असलेल्या लोकांसाठी घरात अनवाणी चालणे अतिशय धोकादायक ठरू शकते. या आजारात पायांच्या नसांची संवेदनशीलता कमी होते, त्यामुळे लहान जखम, फोड किंवा काप वेळेवर लक्षात येत नाहीत. फरशीवर पडलेल्या छोट्या-मोठ्या वस्तूंमुळेही गंभीर जखमा किंवा संसर्ग होऊ शकतो. कोव्हीड महामारीच्या काळात घरात चालताना बोटे आणि पायांच्या फ्रॅक्चरच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले होते. तज्ज्ञांच्या मते, घरातही बूट घातल्यास स्थिरता वाढते आणि दुखापतीचा धोका कमी होतो.
advertisement
अनवाणी फरशीवर चालल्याने टाचा, घोटे, गुडघे आणि कंबरेवरही अतिरिक्त ताण येतो. विशेषतः टाइल्स किंवा मार्बलसारख्या कडक पृष्ठभागावर अनवाणी चालल्यामुळे टाचदुखी, सांध्यांची जडपणा, अ‍ॅकिलीस टेंडोनायटिस आणि पाठदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. थंड फरशीवर अनवाणी चालल्याने शरीराचे तापमानही प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे सर्दी-खोकला आणि पाय थंड होण्याची तक्रार होऊ शकते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये याचा परिणाम लवकर दिसून येतो. दीर्घकाळ थंड पृष्ठभागाच्या संपर्कात राहिल्याने स्नायूंमध्ये ताण, जखडलेपणा आणि आकडी येण्याची समस्या देखील होऊ शकते.
advertisement
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, घराच्या आत हलके, आरामदायक आणि सपोर्ट देणारे बूट किंवा स्लिपर्स घालणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. चांगली कुशनिंग, आर्च सपोर्ट आणि मजबूत ग्रिप असलेले फुटवेअर निवडावे. खूप पातळ किंवा पूर्णपणे वाकणाऱ्या चप्पला नुकसानदायक ठरू शकतात. बाथरूमसाठी वेगळी चप्पल ठेवावी, घरातील आणि बाहेरील चपला वेगवेगळ्या वापराव्या, जेणेकरून घाण आणि जंतूं पासून बचाव होईल. काही वेळ अनवाणी चालणे आरामदायक वाटू शकते, पण दीर्घकाळ ही सवय पाय, सांधे आणि संपूर्ण शरीराला नुकसान पोहोचवू शकते. छोटीशी काळजी मोठ्या आरोग्य समस्यांपासून वाचवू शकते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking Barefoot : काय सांगता! घरात चप्पल न घालता फिरणंही ठरू शकतं आजारांचं कारण, वाचा दुष्परिणाम
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement