ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर एमएस धोनीकडे सीएसकेचं नेतृत्व पुन्हा एकदा देण्यात आलं, पण सीएसकेच्या या निर्णयावर चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ऋतुराजला खरंच दुखापत झाली का त्याला टीममधून बाहेर केलं? अशा शंका चाहत्यांकडून उपस्थित केल्या जात आहेत. नुकताच ऋतुराज गायकवाड त्याच्या पत्नीसोबत हनुमान गढीवर हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता.
advertisement
ऋतुराज गायकवाडचा हनुमान गढीचं दर्शन घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये चाहत्यांनी त्याला खरंच दुखापत झाली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधीही ऋतुराज गायकवाडचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यावरूनही चाहत्यांनी ऋतुराजला खरंच दुखापत झाली आहे का? अशा कमेंट केल्या होत्या.
दुखापतीच्या दोन मॅचनंतर ऋतुराज बाहेर
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा बॉल ऋतुराजच्या कोपराला लागला, यानंतर तो दिल्ली आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळला, पण केकेआरविरुद्धच्या मॅचआधी ऋतुराजच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. कोपराला फ्रॅक्चर झाल्याचं दोन सामन्यांनंतर कसं समोर आलं? फ्रॅक्चर असतानाही ऋतुराज दोन मॅच कसा खेळला? अशा वेगवेगळ्या शंका तेव्हाही चाहत्यांनी उपस्थित केल्या होत्या.