TRENDING:

IPL 2026 :आधी नो लुक सिक्स,नंतर फोर,ॲटीट्यूड दाखवणाऱ्या पांड्याचा बुमराहकडून करेक्ट कार्यक्रम,VIDEO

Last Updated:

हार्दिक पांड्याने बुमराहच्या पहिल्या बॉलला षटकार ठोकला होता,त्यानंतर दुसराच बॉल त्याने चौकार मारला होता. त्यानंतर तिसऱ्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने हार्दिक पांड्याचा काटा काढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians : आयपीएल 2026च्या 19 व्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेतला पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. तर रविवारी दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मैदानात सरावाला सूरूवात केली आहे. या सरावा दरम्यान एक भन्नाट किस्सा घडला आहे. हार्दिक पांड्याने बुमराहच्या पहिल्या बॉलला षटकार ठोकला होता,त्यानंतर दुसराच बॉल त्याने चौकार मारला होता. त्यानंतर तिसऱ्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने हार्दिक पांड्याचा काटा काढला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
jasprit bumrah vs hardik pandya
jasprit bumrah vs hardik pandya
advertisement

खरं तर आयपीएल सुरु व्हायल आता जवळपास 10 दिवसांचा कालावधी उरला आहे.त्याआधी मुंबई इंडियन्सने सरावाला सूरूवात केली आहे. मुंबईच्या कॅम्पमध्ये रोहित शर्माची देखील एंन्ट्री झाली आहे.त्यामुळे मुंबई इंडियन्स संपूर्ण ताकदीनिशी मैदानात सराव करते आहे. या सरावाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील समोर येत आहेत.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

advertisement

या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यातल बॅटल दाखवण्यात आलं आहे. या सरावात हार्दिक पांड्या बॅटींग करतो आहे, तर जसप्रीत बुमराह त्याला गोलंदाजी करताना दिसला आहे. या दरम्यान व्हिडिओत बुमराहच्या पहिल्याच बॉलवर हार्दिक पांड्या नो लुक सिक्स मारतो.त्यानंतर दुसरा बॉलवर हार्दिक पांड्या खतरनाक चौकार मारतो.अशाप्रकारे दोन बॉलमध्ये 10 धावा काढल्यानंत हार्दिक पांड्याचा आत्मविश्वास भलताच वाढतो. पण तिसऱ्या बॉलवर जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्याची विकेट काढून त्याचा करेंक्ट कार्यक्रम करतो. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

advertisement

दरम्यान आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.या पहिल्या टप्प्यात मुंबईचे चार सामने खेळवण्यात येणार आहे.हे सामने कोणत्या टीम सोबत असणार आहेत? आणि कधी, कुठे खेळवले जाणार आहेत? हे जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्सच्या चार सामन्यांचे वेळापत्रक

पहिला सामना :मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स, 29 मार्च 2026

advertisement

दुसरा सामना : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल 2026

तिसरा सामना : राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल 2026

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

चौथा सामना : मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 12 एप्रिल 2026

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 :आधी नो लुक सिक्स,नंतर फोर,ॲटीट्यूड दाखवणाऱ्या पांड्याचा बुमराहकडून करेक्ट कार्यक्रम,VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल