केकेआरचं प्लेऑफचं गणित
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यांचे 11 गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 0.249 आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणं महत्त्वाचं आहे. त्यांचे उर्वरित सामने चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्याविरुद्ध आहेत. पंधरा गुण कोलकाता नाईट रायडर्सला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची एक संधी देऊ शकतात. मात्र, अधिक वास्तववादी दृष्टिकोन पाहता, त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान 17 गुणांची आवश्यकता असेल.
advertisement
थाला मुंबईला दाखवणार प्लेऑफचा रस्ता
जर चेन्नईने आज कोलकाताचा पराभव केला तर पाईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ तर होणार नाही. पण चेन्नईच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा रस्ता क्लियर होईल. केकेआर आज हारली तर त्यांना प्लेऑफची दिशा अंधूक दिसणार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅप्टल्स यांच्यात फाईट होण्याची शक्यता दिसतीये. त्यामुळे आता थाला मुंबईला प्लेऑफची दिशा दाखवणार का? असा सवाल विचारला जातोय. काल मुंबईच्या पराभवानंतर आता 24 तासात मुंबईचं नशिब बदलताना दिसू शकतं.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी पुढील आव्हानं
केकेआरचं प्लेऑफमधील स्थान इतर संघांच्या निकालांवर आणि नेट रन रेटवर अवलंबून राहू शकतं. घरच्या मैदानावर खेळला जाणारा कोलकाता नाईट रायडर्सचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा असेल. चेन्नई एक मजबूत संघ आहे आणि त्यांना हरवणं मोठं आव्हान असेल. तसेच हैदराबादला त्यांच्यात घरच्या मैदानावर पराभूत करणं कठीण जाऊ शकतं. त्याचबरोबर बंगळूरुच्या घरच्या मैदानावर खेळणं आणि त्यांना हरवणं हे देखील एक मोठं आव्हान असेल.
अजिंक्य रहाणेसाठी करो या मरो
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालांवरही लक्ष ठेवावे लागेल. त्यांची पुढील वाटचाल निश्चितच रोमांचक असणार आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआर कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.