RCB च्या नव्या कर्णधाराची परीक्षा
या हंगामात RCB च्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारवर सोपवण्यात आली आहे. RCB ने 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली, मात्र प्रत्येक वेळी संघ विजेतेपदापासून दूर राहिला. त्यामुळे यंदा त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
IPL सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मिळाली गुड न्यूज
advertisement
IPL च्या उद्घाटन सामन्याचे ऐतिहासिक आकडे काय सांगतात?
IPL 2008 पासून आतापर्यंत 17 हंगाम खेळले गेले आहेत. मात्र, केवळ 6 वेळा उद्घाटन सामना खेळणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.
-पहिला सामना खेळणाऱ्या संघाने केवळ 6 वेळा (2011, 2014, 2015, 2018, 2020, 2023) विजेतेपद मिळवले आहे.
-फक्त 3 वेळा (2011, 2014, 2018) पहिला सामना जिंकणाऱ्या संघाने विजेतेपद मिळवले आहे.
-तर 3 वेळा (2015, 2020, 2023) पहिला सामना हरलेल्या संघानेही IPL जिंकले आहे.
यावरून स्पष्ट होते की पहिल्या सामन्याचा निकाल विजेतेपदासाठी निर्णायक ठरत नाही, मात्र आकडेवारीनुसार KKR आणि RCB दोघांनाही अधिक सावध राहावे लागणार असे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ
-आतापर्यंत मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी प्रत्येकी 5 वेळा (MI - 2013, 2015, 2017, 2019, 2020, CSK - 2010, 2011, 2018, 2021, 2023) विजेतेपद मिळवले आहे.
-KKR 3 वेळा (2012, 2014, 2024) विजेता ठरला आहे.
बुमराहचे करिअर धोक्यात? MIच्या माजी प्रशिक्षकाच्या दाव्यानंतर अफवांना ऊत
- सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स यांनी प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर राजस्थान रॉयल्स (2008) आणि गुजरात टायटन्स (2022) यांनी 1-1 ट्रॉफी उचलली आहे.
IPL ट्रॉफी न जिंकणारे संघ
IPL मध्ये आजवर RCB, दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या संघांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. तसेच, पूर्वी अस्तित्वात असलेल्या पुणे वॉरियर्स, गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स या संघांनाही एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही.
22 मार्चला होणाऱ्या KKR विरुद्ध RCB सामन्याने IPL 2025 च्या धामधुमीला सुरुवात होईल. यंदाच्या हंगामात RCB त्यांच्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा संपवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.