Jasprit Bumrah Injury: बुमराहचे करिअर धोक्यात? MIच्या माजी प्रशिक्षकाच्या दाव्यानंतर अफवांना ऊत, जाणून घ्या सत्य
- Published by:Jaykrishna Nair
- Written by:Prashant Gomane
Last Updated:
Jasprit Bumrah Injury: न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड याने दावा केला आहे की, जर जसप्रीत बुमराहला पुन्हा तीच दुखापत झाली, तर त्याचे करिअर संपुष्टात येऊ शकते. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा फिटनेस मोठा प्रश्नचिन्ह ठरत असून भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबई: आयपीएलचा 18वा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले असताना सर्वाधिक चर्चा होत आहे ती मुंबई इंडियन्सचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत होय. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या क्रिकेटपासून दूर आहे. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. सिडनी येथे झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाठीच्या दुखापतीमुळे त्याला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळेच तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संघातून बाहेर पडला. आता मार्च महिना अर्ध्यावर आला तरी त्याने अजून गोलंदाजी सुरू केलेली नाही.
जसप्रीत बुमराह मैदानावर पुन्हा कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना त्याच्याबद्दल बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बुमराहचे करिअर संपले, तो पुन्हा मैदानावर दिसणार नाही अशा बातम्या समोर येत आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये खरच तथ्य आहे का आणि या चर्चा कशामुळे सुरू झाल्या ते जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी प्रशिक्षक शेन बॉन्डने बुमराहच्या दुखापतीबाबत मोठा दावा केला आहे. बॉन्डने स्पष्ट सांगितले की, जर त्याच ठिकाणी पुन्हा दुखापत झाली, तर त्याचा संपूर्ण क्रिकेट करिअर संपुष्टात येऊ शकतो.
advertisement
शेन बॉन्ड यांचा मोठा इशारा
शेन बॉन्डने सांगितले की, त्यांना आधीच अंदाज होता की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात स्थान मिळवू शकणार नाही. बॉन्डने असेही म्हटले आहे की, आयपीएलनंतर लगेच इंग्लंड दौरा होणार आहे, जिथे पाच कसोटी सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत वेगवान बदल करणे बुमराहसाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
मुलाखतीत बॉन्ड म्हणाला...
जेव्हा तो स्कॅनसाठी सिडनीला गेला, तेव्हा समजले की त्याला केवळ साधी दुखापत आहे. मात्र, मला शंका होती की, ही साधी दुखापत नसून हाडांशी संबंधित मोठी दुखापत असू शकते. त्यामुळेच मला वाटले की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही.
क्रिकेटपटूवर धर्म बदलण्यासाठीची जबरदस्ती, माजी गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ
त्याने पुढे असेही सांगितले की, बुमराह ठीक होईल, पण वर्कलोड मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड दौऱ्याच्या वेळी बुमराहला आरामाची संधी कुठे मिळेल, हे पाहणे गरजेचे आहे. कारण आयपीएल संपल्यानंतर लगेच कसोटी क्रिकेटमध्ये जाणे धोकादायक ठरू शकते.
advertisement
T20 वरून कसोटी खेळणे कठीण
शेन बॉन्डने स्पष्ट केले की, एकदिवसीय सामन्यांमधून कसोटी क्रिकेटमध्ये जाणे सोपे असते, कारण खेळाडूंना सातत्याने 50 षटकांचा सामना करावा लागतो. मात्र, T20 क्रिकेटमधून थेट कसोटीत जाणे अत्यंत कठीण असते.
T20 क्रिकेटमध्ये एका आठवड्यात तीन सामने खेळले जातात, त्यात दोन दिवस प्रवासासाठी जातात. कसोटी सामन्यातील वर्कलोड त्याच्या दुपटीने अधिक असतो. त्यामुळे खेळाडूचे शरीर एवढ्या झपाट्याने बदलाला तयार नसते. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय संघ जून ते ऑगस्टदरम्यान इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे आणि आयपीएल मे महिन्याच्या अखेरीस संपेल. त्यामुळे बुमराहला कसोटी क्रिकेटसाठी तयार करणे खूप अवघड ठरेल.
advertisement
शेन बॉन्ड यांचा धक्कादायक दावा
बॉन्ड म्हणाला, जर बुमराहला पुन्हा त्याच जागी दुखापत झाली, तर त्याचे करिअर धोक्यात येऊ शकते. कारण त्या भागावर पुन्हा शस्त्रक्रिया करणे शक्य आहे का, याची खात्री नाही. त्यांच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगळा विचार करून बुमराहच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला हवा. बॉन्डने स्पष्ट केले की, खेळाडू खेळण्यासाठी उतावळा असतो, पण व्यवस्थापनाने त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah Injury: बुमराहचे करिअर धोक्यात? MIच्या माजी प्रशिक्षकाच्या दाव्यानंतर अफवांना ऊत, जाणून घ्या सत्य