ऋतुराज गायकवाड हातच्या फ्रॅक्चरमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नसला, तरी सोशल मीडियावर चाहते त्याच्या दुखापतीच्या टायमिंगवर संशय व्यक्त करत आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या कोपराला बॉल लागला, यानंतर ऋतुराज सीएसकेसाठी 2 मॅच खेळला. या दोन्ही सामन्यामध्ये सीएसकेचं नेतृत्व करत असतानाच ऋतुराजने बॅटिंग आणि फिल्डिंगही केली, मग ऋतुराजचं कोपर अचानक आता फ्रॅक्चर कसं झालं? असा सवाल चाहत्यांकडून विचारला जात आहे.
advertisement
ऋतुराजचा जडेजा केला?
याआधी 2022 साली चेन्नईने रवींद्र जडेजाला टीमचं नेतृत्व दिलं होतं, पण पहिल्या आठ सामन्यांमधल्या खराब कामगिरीनंतर जडेजाकडून टीमचं नेतृत्व काढून पुन्हा धोनीकडेच देण्यात आलं. 2022 साली सीएसकेने 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकल्या आणि पॉईंट्स टेबलमध्ये ते नवव्या क्रमांकावर राहिले.
चेन्नईचा संघर्ष
आयपीएल 2025 मध्येही चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबईविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईने लागोपाठ पुढचे 4 सामने गमावले आहेत. 5 पैकी 1 विजय आणि 4 पराभवासह चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. आता धोनीकडे पुन्हा कॅप्टन्सी आल्यानंतर चेन्नईचं नशीब बदलेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.