मुंबईने दिलेल्या एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन शुबमन गिलच्या रुपात धक्का लागला. 2 बॉलमध्ये एक रन करून गिल आऊट झाला, त्यानंतर कुसल मेंडिसही 20 रनवर माघारी गेला. पण साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. साई सुदर्शनने 49 बॉलमध्ये 80 आणि वॉशिंग्टन सुंदरने 24 बॉलमध्ये 48 रन केले.
advertisement
जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने सुदर्शन आणि सुंदरची पार्टनरशीप तुटली, जेव्हा वॉशिंग्टन सुंदर बोल्ड झाला. सुंदर आऊट झाल्यानंतर शर्फेन रदरफोर्डनेही 24 रनची आक्रमक खेळी केली, पण रदरफोर्ड आऊट झाल्यानंतर राहुल तेवतिया बॅटिंगला आला. यश दयाळला 5 सिक्स मारल्यानंतर राहुल तेवातिया प्रकाशझोतात आला होता, त्यामुळे यंदाच्या लिलावात गुजरातने तेवातियाला तब्बल 4 कोटी रुपये दिले, पण तेवतियाला त्याची जुनी जादू दाखवता आली नाही.
राहुल तेवातियाने 11 बॉलमध्ये 16 रन केले, तर शाहरुख खानने 7 बॉलमध्ये 13 रनची खेळी केली. शाहरुख खानलाही गुजरातकडून खेळताना त्याची चमक दाखवता आली नाही. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर बुमराह, ग्लिसन आणि अश्वनी कुमारला 1-1 विकेट मिळाली.