रोहित शर्मा मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू असला तरी या सामन्यात रोहितला दोन जीवनदान मिळाली. गुजरातचा फास्ट बॉलर गेराल्ड कोटझी आणि विकेट कीपर कुसल मेंडिसने रोहितचा एक कॅच सोडला. याच सामन्यात कुसल मेंडिसने सूर्यकुमार यादवलाही जीवनदान दिलं. यानंतर बॅटिंगला आल्यानंतरही कुसल मेंडिस हिट विकेट आऊट झाला.
इंग्लंडचा जॉस बटलर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रवाना झाला, त्यामुळे गुजरातने कुसल मेंडिसला संधी दिली, पण एकाच सामन्यात कुसल मेंडिसने तीन आत्मघातकी चुका केल्या. 10 बॉलमध्ये 20 रन करून मेंडिस आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला, जेव्हा ट्रेन्ट बोल्टने गुजरातचा कर्णधार शुबमन गिल 2 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला.
advertisement
मुंबई आणि गुजरात यांच्यातला हा सामना एलिमिनेटर आहे. या सामन्यात पराभव झालेल्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल, तर विजय मिळवलेली टीम रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर-2 सामना खेळेल. क्वालिफायर-2 मध्ये विजय मिळवलेली टीम फानयलमध्ये आरसीबीविरुद्ध खेळेल. क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.