आयपीएलमधल्या आरसीबीच्या या विजयासोबतच प्ले-ऑफचे सामनेही आता निश्चित झाले आहेत. आयपीएल प्ले-ऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब आणि आरसीबीचा सामना होईल, तर मुंबई आणि गुजरातमध्ये एलिमिनेटरची मॅच होईल. पंजाब आणि आरसीबी यांच्यातील क्वालिफायर-1 चा सामना गुरूवार 29 मे रोजी होईल, तर मुंबई आणि गुजरात यांच्यात शुक्रवार 30 मे रोजी सामना होईल.
पंजाब आणि आरसीबी यांच्यात विजय मिळवलेली टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर मुंबई आणि गुजरात यांच्यात पराभव झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल. तर विजय झालेली टीम पंजाब आणि आरसीबी यांच्यातल्या पराभूत टीमविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल. क्वालिफायर-2 चा सामना 1 जूनला होणार आहे. या सामन्यात विजयी झालेली टीम 3 जूनला आयपीएलची फायनल खेळेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 11:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : अखेर ठरलं! एलिमिनेटरमध्ये मुंबई कुणाशी भिडणार... तारीखही फिक्स झाली