क्वालिफायर-1 जिंकणारी टीम चॅम्पियन
आयपीएलमध्ये प्ले-ऑफचा फॉरमॅट 2011 साली सुरू झाला, त्याआधी दोन सेमी फायनल आणि फायनल खेळवली जायची. या मोसमाच्या आधी 14 वेळा प्ले-ऑफ फॉरमॅटमध्ये खेळवला गेला आहे. यातल्या मागच्या 11 मोसमांपैकी फक्त 2 वेळाच क्वालिफायरमध्ये पराभूत झालेली टीम आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर 9 वेळा क्वालिफायर-1 जिंकणारी टीम आयपीएल चॅम्पियन ठरली आहे. 2013 आणि 2017 साली मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर-1 च्या सामन्यात पराभव झाला होता, तरीही त्यांनी ट्रॉफी जिंकली. तर 2016 साली सनरायजर्स हैदराबादने एलिमिनेटर, क्वालिफायर-2 आणि फायनलही जिंकली होती, असा विक्रम करणारी हैदराबाद आयपीएल इतिहासातील एकमेव टीम आहे.
advertisement
क्वालिफायर हरूनही फायनल गाठली
आयपीएल इतिहासामध्ये आतापर्यंत 11 वेळा क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेल्या टीमने फायनल गाठली आहे, म्हणजेच या टीमनी क्वालिफायर-2 जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातही सनरायजर्स हैदराबादने क्वालिफायर-1 चा सामना गमावला होता, पण त्यांनी क्वालिफायर-2 च्या सामन्यात विजय मिळवत फायनल गाठली, पण फायनलमध्ये त्यांचा केकेआरने पराभव केला.
क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स मुंबई किंवा गुजरात यांच्याविरुद्ध खेळेल. रविवार 2 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यातील विजेती टीम 3 जूनला आरसीबीविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल. आयपीएल फायनलही अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे.