झहीरने विराटला फोनमध्ये काय दाखवलं?
झहीर आणि विराट यांचा एक व्हिडिओ LSG ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये फ्रँचायझी मेटॉर झहीर खान आणि आरसीबी स्टार फलंदाज विराट कोहली बोलत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये झहीर खान त्याच्या फोनवर किंग कोहलीला काहीतरी दाखवताना दिसत आहे. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. झहीरने यावेळी विराटला त्याला लाडक्या एका महिन्याच्या बाळाचा फोटो दाखवला, जो त्याने सोशल मीडियावर आत्तापर्यंत शेअर केला नाही.
advertisement
थांब तुला काहीतरी दाखवतो...
विराट आणि झहीर गप्पा मारत असताना झहीरने खिशात हात घातला आणि फोन बाहेर काढला. थांब तुला काहीतरी दाखवतो, असं झहीर म्हणाला. झहीरने आपल्या मुलाचा फोटो विराटला दाखवला. त्यावेळी विराटचा चेहरा आनंदाने फुलला. कसा आहे तो? असा सवाल विराटने केला. तर त्याचे डोळे तुझ्यावर गेलेत, असंही विराट यावेळी झहीरला म्हणताना दिसतोय. याचा व्हिडीओ लखनऊने शेअर केलाय.
पाहा Video
फतेहसिंग खान
दरम्यान, झहीर खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिने एका मुलाला जन्म दिला आहे. 16 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी गुड न्यूज दिली होती. एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करताना या जोडप्याने लिहिले की, 'प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह, आम्ही आमच्या गोड लहान बाळाचे, फतेह सिंग खानचे स्वागत करतो.' झहीर आणि सागरिकाच्या या पोस्टवर अनेकांनी अभिनंदनास्पद कमेंट्स आल्या होत्या.