केकेआर फ्रँचायझीची मालकी नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे, जी 2008 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता-समर्थित मेहता ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमातून स्थापन करण्यात आली होती.
वृत्तांनुसार, रेड चिलीज एंटरटेनमेंटकडे संयुक्त उपक्रमात 55 टक्के हिस्सा आहे, उर्वरित 45 टक्के हिस्सा मेहता ग्रुपकडे आहे आणि शाहरुख खान, जुही चावला आणि मेहता (जुही चावलाचा पती) या त्रिकुटाने पहिल्या आयपीएल लिलावात टीमसाठी सुमारे 75 मिलियन डॉलर्स दिले आहेत. केकेआर आरसीबी आणि राजस्थानप्रमाणे त्यांच्या मालकीचा बहुसंख्य हिस्सा विकणार नाही, तर मेहता ग्रुप अल्प हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. हा करार प्राथमिक टप्प्यात असल्याचं सूत्रांनी मनी कंट्रोलला सांगितलं आहे.
advertisement
या डिलसाठी सल्लागार म्हणून इन्व्हेस्टमेंट बँक नोमुरा यांना नियुक्त करण्यात आलं आहे. हा करार 2026 च्या सुरूवातीला जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. केकेआरला याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी यावर भाष्य करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सनेही त्यांच्या टीमचा हिस्सा विक्रीला काढला आहे. या दोन्ही फ्रँचायझीना अनुक्रमे 2 अब्ज डॉलर्स आणि 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तची रक्कम अपेक्षित आहे.
लिलावात केकेआरने पैसा ओतला
2026 च्या लिलावामध्ये केकेआरने 63 कोटी 85 लाख रुपये खर्च केले. केकेआरने लिलावात कॅमरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. याचसोबत ग्रीन आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला. याशिवाय केकेआरने श्रीलंकेचा फास्ट बॉलर मथिशा पथिराणाला 18 कोटींना विकत घेतलं आहे.
