आपल्या छोट्या करिअरमध्ये प्रशांतने पॉवर हिटिंग आणि डावखुऱ्या स्पिन बॉलिंगने अनेकांना प्रभावित केलं. रवींद्र जडेजाला रिलीज केल्यानंतर सीएसकेला त्याचासारखाच हिटर आणि डावखुरा स्पिनर हवा होता, त्यामुळे त्यांनी प्रशांत वीरसाठी पैशांचा पाऊस पाडला. प्रशांत वीर हा सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे, जिथे त्याने 7 सामन्यांमध्ये 169.19 च्या स्ट्राईक रेटने 37.33 च्या सरासरीने 112 रन केले, त्याचा सर्वोत्तम स्कोअर बिहारविरुद्ध नाबाद 40 रन होता.
advertisement
बॉलिंगमध्येही प्रशांत वीरने उत्कृष्ट कामगिरी केली. 7 इनिंगमध्ये त्याने 6.76 चा इकोनॉमी रेट आणि 18.77 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या. आयपीएल लिलावासाठी प्रशांतची बेस प्राईज 30 लाख रुपये होती.
प्रशांत वीर इमर्जिंग प्लेअर
उत्तर प्रदेश टी-20 लीगच्या 2025 च्या मोसमात प्रशांत वीरला इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन देऊन गौरवण्यात आलं. नोएडा सुपरकिंग्सचं प्रतिनिधीत्व करताना प्रशांतने 10 इनिंगमध्ये 64 च्या सरासरीने 155.34 च्या स्ट्राईक रेटने 320 रन केले, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. तर बॉलिंगमध्ये त्याने 8 विकेट घेतल्या.
अंडर-23 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट
आपला हा शानदार फॉर्म कायम ठेवत प्रशांत वीरने अंडर-23 स्टेट ट्रॉफीमध्येही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळवला. पण उत्तर प्रदेशचा फायनलमध्ये तामिळनाडूने पराभव केला. प्रशांतने 7 सामन्यांमध्ये 94 ची सरासरी आणि 128.76 च्या स्ट्राईक रेटने 376 रन केले, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. बॉलिंगमध्येही त्याने 7 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या.
धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पूर्ण
प्रशांत वीरने आयपीएल लिलावाआधी एमएस धोनीसोबत एक सिझन तरी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'मला सीएसकेसोबत खेळायला आवडेल, कारण धोनी सरांसोबत कमीत कमी एक मोसम तरी खेळण्याचं माझं स्वप्न आहे. मला खूप काही शिकायला मिळेल, खासकरून त्यांचा शांतपणा, कारण मीदेखील खालच्या क्रमांकावर बॅटिंग करतो', असं प्रशांत वीर आयपीएल लिलावाआधी म्हणाला होता.
युवराज सिंग आदर्श
20 वर्षांच्या प्रशांत वीरचा आवडता क्रिकेटपटू युवराज सिंग आहे. मी युवराज सिंगला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, कारण तोदेखील माझ्यासारखाच डावखुरा बॅटर आणि डावखुरा स्पिन बॉलर आहे, असं प्रशांत वीर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.
