TRENDING:

IPL 2026 : 'मला माफ करा, पण तुम्हाला काय माहिती?', 11 कोटींचा 'धोकेबाज', भारतीयांवरच भडकला!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या मोसमाला आजपासून सुरूवात होत आहे, पण बरेच दिग्गज खेळाडू अजूनही आयपीएल खेळण्यासाठी पोहोचलेले नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 च्या मोसमाला आजपासून सुरूवात होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होत असलं तरी ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू दुखापत आणि वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे अजून भारतात दाखल झालेले नाहीत, यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे.
'मला माफ करा, पण तुम्हाला काय माहिती?', 11 कोटींचा 'धोकेबाज', भारतीयांवरच भडकला!
'मला माफ करा, पण तुम्हाला काय माहिती?', 11 कोटींचा 'धोकेबाज', भारतीयांवरच भडकला!
advertisement

आरसीबीचा फास्ट बॉलर जॉश हेजलवूड दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तर पॅट कमिन्स हैदराबादच्या टीममध्ये असला तरी तो सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. दिल्लीचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कही अजून आयपीएलमध्ये दाखल झालेला नाही. स्टार्कला नेमकी कोणती दुखापत झाली आहे? याबाबतही सस्पेन्स निर्माण झाला आहे.

मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मिचेल स्टार्कवर टीका होत असतानाच आता त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मिचेल स्टार्कने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने भारतीय मीडियावर निशाणा साधला आहे.

advertisement

काय म्हणाला स्टार्क?

'मी सध्या माझ्या खांद्याच्या आणि कोपराच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. ऑस्ट्रेलियन हंगाम सुरू असताना मला या दुखापतीच्या तीव्रतेबद्दल माहिती नव्हती. भारतीय मीडिया आणि काही व्यक्तींनी आयपीएलमधील माझ्या सहभागाबद्दल काही कठोर विधानं केली आहेत. खेळाडूंबद्दल त्यांनी अत्यंत चुकीची मतं मांडली आहेत. त्यांना माझं शरीर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे का?', असा सवाल मिचेल स्टार्कने विचारला आहे.

advertisement

'या दुखापतीमुळे आणि वेळेमुळे दिल्लीची टीम अडचणीत आली आहे, हे मी मान्य करतो. मी हंगामाच्या सुरूवातीला उपलब्ध नसल्यामुळे त्यांची माफीही मागतो. दिल्लीच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या फिटनेसबद्दल मी टीमला सतत माहिती देत आहे. शक्य तितक्या लवकर मी दिल्लीच्या टीममध्ये येण्यासाठी जे काही शक्य आहे ते मी करत आहे', असं स्पष्टीकरण मिचेल स्टार्कने दिलं आहे. मिचेल स्टार्कला दिल्लीने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
सर्व पहा

मिचेल स्टार्क याच्यावर याआधीही आयपीएल लिलावातून माघार घेतल्याबद्दल आणि स्पर्धा मध्येच सोडून दिल्याबद्दल अनेकदा टीकाही झाली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात ऑपरेशन सिंदूरवेळी आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आली, यानंतर स्टार्क ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, पण स्पर्धा पुन्हा सुरू झाली तेव्हा मात्र स्टार्क परतला नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'मला माफ करा, पण तुम्हाला काय माहिती?', 11 कोटींचा 'धोकेबाज', भारतीयांवरच भडकला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल