राजस्थानची डेवाल्ड ब्रेव्हिसची मागणी
जडेजा आणि सॅमसन हे दोन्ही खेळाडू 18 कोटी रुपयांचे खेळाडू आहेत आणि हा करार आतापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता. परंतु, राजस्थान रॉयल्सला हा केवळ सरळ अदलाबदल मान्य नसल्याचं समजतंय. राजस्थान रॉयल्स कराराचा एक भाग म्हणून जडेजासह दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थानचे मालक मनोज बदळे मुंबईत असून त्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत.
advertisement
RR कडून बेबी डिव्हिलअर्सची मागणी
गेल्या हंगामाच्या मध्यातच डेवाल्ड ब्रेव्हिस हा गुर्जपनीत सिंगच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. दक्षिण आफ्रिकेच्या या तरुण फलंदाजाने लवकरच जागतिक फ्रँचायझी सर्किटमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित केलं आहे. पुढील 10 वर्ष आयपीएल गाजवणारा प्लेयर म्हणून डेवाल्ड ब्रेव्हिस याच्याकडे पाहिलं जातं. डेवाल्ड ब्रेव्हिसला क्रिकेट जगतात बेबी डिव्हिलअर्स म्हणून ओळखलं जातं.
हेनरिक क्लासेनला ट्रेड करण्यास नकार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हेनरिक क्लासेनला याच्या बदल्यात संजूला ट्रेड करणार असल्याची चर्चा होती. मात्र, सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला ट्रेड करण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी रविचंद्रन आश्विन याने खुलासा केला होता की, अनेक संघांना रिप्लेसमेंट म्हणून डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात घेण्याची इच्छा होती. मात्र चेन्नई संघाने त्याच्या एजंटशी तडजोडी करत जास्त पैसे खर्च केले आणि त्याला संघात घेतलं. त्यामुळे आता सीएसके आपल्या स्टार प्लेयरला सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.
