संजू सॅमसन हा आयपीएलच्या मागच्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता, पण मतभेद झाल्यानंतर त्याने राजस्थानची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्ज एमएस धोनीचा उत्तराधिकारी शोधत आहे. संजू सॅमसन हा विकेट कीपिंग करतो तसंच त्याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे, त्यामुळे सीएसकेने संजू सॅमसनला टीममध्ये आणल्याचं बोललं गेलं, पण आता सीएसकेने त्यांच्या कर्णधाराची घोषणा करून टाकली आहे.
advertisement
आयपीएल 2026 च्या मोसमात ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार असेल, अशी पोस्ट सीएसकेने केली आहे. या पोस्टनंतर संजू सॅमसनला चेन्नईने धोका दिल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत. ऋतुराज गायकवाड हा मागच्या मोसमात चेन्नईचा कर्णधार होता, पण सिझनच्या मध्येच त्याला दुखापत झाली त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला. यानंतर एमएस धोनीकडे टीमचं नेतृत्व सोपवलं गेलं, पण त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर राहिली.
मुंबईने हार्दिकला दिली होती कॅप्टन्सी
याआधी दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून टीममध्ये आणलं. हार्दिक गुजरातचा कर्णधार होता, पण तरीही त्याने गुजरातची साथ सोडली. मुंबईमध्ये आल्यानंतर रोहितची कॅप्टन्सी काढून हार्दिकला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. सीएसकेने मात्र राजस्थानचा कर्णधार असलेल्या संजूला टीममध्ये आणूनही त्याला कॅप्टन्सी दिली नाही.
सीएसकेने सोडले 10 खेळाडू
आयपीएल 2026 च्या लिलावाआधी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल 11 खेळाडू टीमबाहेर केले आहेत, त्यामुळे चेन्नईकडे लिलावात खर्च करण्यासाठी 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत, तसंच या रकमेमधून चेन्नई 9 खेळाडू विकत घेऊ शकते.
चेन्नईने सोडलेले खेळाडू
राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, सॅम करन, दीपक हुड्डा, विजय शंकर, शेख रशीद, रवींद्र जडेजा, कमलेश नागरकोटी, मथीशा पथीराणा
चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्वील पटेल, संजू सॅमसन (ट्रेड), डेवॉन कॉनवे, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्णा घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजनप्रीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, मुकेश चौधरी
