TRENDING:

IPL 2026 : शाहरूख खानचे 24 कोटी बुडवले, त्याच खेळाडूला काव्या मारन संघात घेणार?

Last Updated:

कोलकत्ता नाईट रायडर्सने 24 कोटी रूपयात या खेळाडूला संघात घेतलं होतं. पण तो खेळाडू फ्लॉप ठरला होता.त्यामुळे शाहरूख खानचे 24 कोटी वाया गेले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 News : आयपीएल 2026 ची सूरूवात व्हायला अजून बराच काळ आहे,पण त्याआधी ट्रेड विंडोतून दररोज नवनवीन अपडेट समोर येत असतात. त्यात यंदाच्या हंगामात कोलकत्ता नाईट रायडर्सने 24 कोटी रूपयात या खेळाडूला संघात घेतलं होतं. पण तो खेळाडू फ्लॉप ठरला होता.त्यामुळे शाहरूख खानचे 24 कोटी वाया गेले होते. आता याच खेळाडूला सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणने संघात घ्यायची तयारी सूरू केली आहे.त्यामुळे कदाचित तो पुढच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे.
ipl 2026 kavya maran
ipl 2026 kavya maran
advertisement

आयपीएल ट्रेड विंडोबाबत दररोज काही ना काही अपडेट्स येत असतात.आता काव्या मारनचा सनरायझर्स हैदराबाद संघ गेल्या वर्षी खराब कामगिरी करणाऱ्या केकेआरच्या अष्टपैलू वेंकटेश अय्यरला संघात समाविष्ट करण्यात रस दाखवत आहे. या खेळाडूला गेल्या हंगामात 23.75 कोटी रूपयात संघात घेतलं होतं. मात्र इतके कोटी रक्कम घेऊन देखील त्याने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.त्यामुळे कोलकत्ता स्पर्धेतून बाहेर झाला होता.

advertisement

आयपीएलच्या 18 व्या हंगामात व्यंकटेश अय्यरने केकेआरसाठी एकूण 11 सामन्यांमध्ये भाग घेतला.दरम्यान त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. संघासाठी सात डावांमध्ये तो 20.29 च्या सरासरीने फक्त 142 धावा करू शकला. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 139.21 होता.त्यामुळे फ्लॉप ठरलेल्या या खेळाडूला काव्या संघात घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

ईशान किशनचा पत्ता कट

advertisement

आयपीएलच्या 19 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झालेल्या ईशान किशनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. फ्रँचायझी त्याच्या जागी व्यंकेटश अय्यरला संघात समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. कारण वेंकटेश अय्यरप्रमाणेच इशान किशनचीही गेल्या हंगामात अशीच अवस्था होती. त्याने त्याच्या संघासाठी 14 सामन्यांमध्ये भाग घेतला.दरम्यान, त्याने 13 डावांमध्ये 35.40 च्या सरासरीने 354 धावा केल्या होत्या यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 152.58 होता.

advertisement

गेल्या वर्षी किशनने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. येथे एका सामन्यात त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी नाबाद 106 धावा होती. गेल्या हंगामात, तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 24 व्या स्थानावर होता. आता ईशान किशनला संघात घ्यायला कोणता संघ पुढाकार घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : शाहरूख खानचे 24 कोटी बुडवले, त्याच खेळाडूला काव्या मारन संघात घेणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल