धोनीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी नाही
महेंद्रसिंग धोनी आता 44 वर्षांचा झालाय. त्यामुळे मॅच खेळताना धोनीला पूर्ण योगदान देता येत नाहीये. तसेच विकेटकिपिंग करताना धोनीला त्रास होत असल्याचं मागील सिझनमध्ये दिसून आलं होतं. त्याचबरोबर बॅटिंगवेळी देखील धोनी क्वचित एखाद्या ओव्हरमध्ये बॅटिंगला येयचा. अशातच आता यंदाच्या आयपीएलमध्ये देखील धोनी फक्त एक ते दोन ओव्हर बॅटिंग करताना दिसेल तर फिल्डिंगवेळी तो विकेटकीपिंग करताना दिसणार नाही.
advertisement
संजू सॅमसनमुळे धोनीचा पत्ता कट
चेन्नई सुपर किंग्जने खेळाडू रिलीज करण्याआधी ट्रेड विंडोमध्ये मोठा डाव खेळला अन् संजू सॅमसनला राजस्थानकडून विकत घेतलं. त्यामुळे आता संजू सॅमसन नक्कीच प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसेल. त्यामुळे धोनीचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होईल. धोनी आगामी आयपीएल हंगामात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी धोनी एखादी ओव्हर बॅटिंगला येईल. धोनी डगआऊटमधूनच चेन्नईची सुत्र हाताळेल, अशी शक्यता आहे.
चेन्नईची बॅटिंग ऑर्डर मजबूत
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची कॅप्टन्सी यंदा संजू सॅमसनकडे नाही तर ऋतुराज गायकवाडकडेच आहे. संजू फक्त विकेटकीपर बॅटर म्हणून खेळेल. मात्र, संजूच्या येण्याने चेन्नईची बॅटिंग ऑर्डर अधिक मजबूत झाली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
