TRENDING:

IPL Auction: एका संघाकडे 5 टीमपेक्षा अधिक पैसा, रक्कम पाहून चाहते थक्क; तुमच्या फेव्हरेट संघाच्या पर्समध्ये किती पैसे?

Last Updated:

IPL 2026 Retention Remaining purse: आयपीएल 2026च्या ऑक्शनपूर्वी फ्रँचायझींच्या पर्सची संपूर्ण माहिती बाहेर आली असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या बजेटमध्ये जबरदस्त तफावत आहे. KKR सर्वाधिक रक्कम घेऊन मैदानात उतरणार असताना MIच्या कमकुवत पर्सने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत आणि सर्व फ्रँचायजींच्या पर्स (खेळाडू रिटेन आणि रिलिझ केल्यानंतरची शिल्लक रक्कम)बाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा म्हणजे पाच वेळा विजेते असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या उपलब्ध रकमेतली अफाट तफावत होय.

advertisement

एका बाजूला एम.एस. धोनीची चेन्नई सुपर किंग्ज तब्बल 43.40 कोटींच्या मोठ्या पर्ससह ऑक्शनमध्ये उतरणार आहे, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडे केवळ 2.75 कोटींचीच उपलब्ध रक्कम आहे. त्यामुळे CSK ऑक्शनमध्ये मोठे आणि दमदार खरेदी करणार हे स्पष्ट आहे, तर मुंबईला अगदी मर्यादित पर्यायांवर समाधान मानावे लागणार आहे.

advertisement

रिटेन्शननंतर लिलावासाठी उपलब्ध असलेल्या रकमेनुसार कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सर्वाधिक तर मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. याशिवाय इतर संघांची पर्सही जाहीर झाली असून आगामी ऑक्शनमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

कोणत्या संघाकडे किती पैसे उपलब्ध?

advertisement

संघ शिल्लक रक्कम
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 43.40 कोटी
मुंबई इंडियन्स (MI) 2.75 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 64.30 कोटी
सनरायजर्स हैदराबाद (SRH) 25.50 कोटी
दिल्ली कॅपिटल्स (DC) 21.80 कोटी
लखनौ सुपर जायंट्स (LSG) 22.95 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) 16.40 कोटी
राजस्थान रॉयल्स (RR) 16.05 कोटी
गुजरात टायटन्स (GT) 12.90 कोटी
पंजाब किंग्ज (PBKS) 11.50 कोटी

advertisement

ऑक्शनचा गेमचेंजर कोण ठरणार?

-KKR कडे सर्वाधिक पर्स आहे- 64.30 कोटी त्यामुळे मोठे परफॉर्मर्स आणि आक्रमक निवडी करण्याची संधी.

-CSK कडेही पुरेसा निधी असल्याने ते काही स्टार प्लेयर्ससाठी मोठी बोली लावू शकतात.

-MI मात्र पर्सच्या कमतरतेमुळे अतिशय मर्यादित खरेदी करणार, त्यामुळे विद्यमान स्क्वॉडवरच मोठा विश्वास दाखवला जाईल.

-SRH, DC, LSG हे संघ मध्यम पर्ससह स्ट्रॅटेजिक खरेदी करू शकतील.

-RCB, RR, GT, PBKS यांना मर्यादित निधीमध्ये अचूक खेळाडू निवडावे लागतील.

आता सगळ्यांची नजर ऑक्शनवर

मोठ्या पर्स असलेल्या संघांमध्ये चुरस वाढणार, तर कमी पर्स असलेल्या संघांवर रणनीती आखण्याचा ताण वाढणार. मुंबईचेन्नईतील तफावत पाहता ऑक्शन दिवस अत्यंत रोचक ठरणार आहे. आयपीएल 2025 च्या सर्वोत्तम संघरचना कोण बनवतो हे पाहण्यासाठी चाहत्यांना आता पुढील महिन्याची प्रतीक्षा असेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction: एका संघाकडे 5 टीमपेक्षा अधिक पैसा, रक्कम पाहून चाहते थक्क; तुमच्या फेव्हरेट संघाच्या पर्समध्ये किती पैसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल