आंद्रे रसेलशिवाय केकेआरने 23.75 कोटी रुपयांच्या व्यंकटेश अय्यरलाही सोडलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली होती, यात आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर यांनाही त्यांची चमक दाखवता आली नाही. केकेआरने आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर यांच्याशिवाय क्विंटन डिकॉक, मोईन अली आणि एनरिक नॉर्किया यांना रिलीज केलं आहे.
केकेआरने रिलीज केलेले खेळाडू
advertisement
आंद्रे रसेल (12 कोटी रुपये)
व्यंकटेश अय्यर ( 23.75 कोटी रुपये)
क्विंटन डि कॉक (3.6 कोटी रुपये)
मोईन अली (2 कोटी रुपये)
एनरिक नॉर्किया (6.5 कोटी रुपये)
केकेआरने व्यंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल यांना रिलीज केलं असलं, तरी लिलावामध्ये ते या दोन्ही खेळाडूंना कमी किंमतीमध्ये विकत घेऊ शकतात. तसंच हे खेळाडू रिलीज केल्यामुळे लिलावामध्ये केकेआरकडे आणखी चांगले खेळाडू विकत घेण्यासाठी जास्त पैसे उपलब्ध असतील. कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य रहाणेलाही रिलीज करेल, असं बोललं जात होतं, पण टीमने रहाणेवर विश्वास दाखवला. आयपीएलच्या पुढच्या मोसमातही केकेआर अजिंक्य रहाणेकडेच टीमचं नेतृत्व देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
