TRENDING:

IPL Auction मध्ये खेळाडूवर लावलेली रक्कम त्यांना पूर्ण मिळते? जर नाही तर वरील पैशांचं काय होतं?

Last Updated:

PL Auction Money Distribution : काही प्रश्न अनेकांच्या मनात येतात, ते म्हणजे बोली लावलेले सर्व पैसे खेळाडूंना मिळतात का? की काही रक्कम कमी होते? सगळे पैसे एकदाच मिळतात का? ते खेळाच्या पूर्वी मिळतात की शेवटी? चला सगळ्या प्रश्नाची माहिती घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजे पैसा, ग्लॅमर आणि रोमांच. क्रिकेट तर भारतीयांच्या नसा नसा भरलेलं आहे. त्यात आयपीएल या क्रिकेट खेळाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. मंगळवारी आयपीएलसाठी खेळाडूंचं ऑक्शन सुरु आहे. यामध्ये काही खेळाडू अनसोर्ड रहातात म्हणजे त्यांना कोणीच खरेदी करत नाहीत, तर काही खेळाडूंना सर्वाधिक बोली लावून विकत घेतलं जातं. लाखोंपासून ते अगदी कोट्यवधींची रुपयांची बोली खेळाडूंवर लागते. पण यानंतर काही प्रश्न अनेकांच्या मनात येतात, ते म्हणजे बोली लावलेले सर्व पैसे खेळाडूंना मिळतात का? की काही रक्कम कमी होते? सगळे पैसे एकदाच मिळतात का? ते खेळाच्या पूर्वी मिळतात की शेवटी? चला सगळ्या प्रश्नाची माहिती घेऊ.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

खरंतर लिलावातील बोलीची रक्कम (Bid Amount) आणि खेळाडूच्या हातात येणारी नेट रक्कम (Net Salary) यात मोठा फरक असतो, जसं सर्वसाधारण लोकांसोबत नोकरीच्या बाबतीत होतं अगदी तसंच. बोलीची रक्कम म्हणजे 100 % पगार नव्हे! खेळाडूवर लिलावात लागलेली बोली ही त्याची Gross Salary किंवा एकूण करार मूल्य असते. ही रक्कम 100% खेळाडूला दिली जात नाही. यात अनेक महत्त्वाच्या 'कट्स' (Deductions) होतात

advertisement

1. सर्वात मोठी कपात: आयकर (Income Tax) खेळाडूंना त्यांच्या IPL उत्पन्नावर आयकर (Income Tax) भरावा लागतो. हा सर्वात मोठा कट असतो.

यात भारतीय खेळाडूंना भारतातील आयकर नियमांनुसार कर भरावा लागतो. तर परदेशी खेळाडूंना भारतात खेळून मिळणाऱ्या उत्पन्नावर भारतीय आयकर भरावा लागतो.

फ्रँचायझी (Franchise) ही रक्कम खेळाडूला देण्यापूर्वीच, नियमानुसार, कर कापून (Tax Deducted at Source - TDS) ती रक्कम थेट भारत सरकारकडे जमा करते. त्यामुळे खेळाडूच्या हातात येणारी रक्कम आधीच कमी होते.

advertisement

2. एजंटचा हिस्सा (Agent Fee)

बहुतेक आंतरराष्ट्रीय आणि मोठे खेळाडू एजंट्सच्या (Agent) माध्यमातून करारावर स्वाक्षरी करतात. हे एजंट खेळाडू आणि फ्रँचायझी यांच्यातील मध्यस्थीचे काम करतात. या सेवेच्या बदल्यात, खेळाडूला मिळालेल्या बोली रकमेतून साधारणपणे 3% ते 5% इतका भाग एजंट फी म्हणून कापला जातो.

खेळाडूंना पैसे कधी आणि कसे मिळतात?

खेळाडूला बोलीची रक्कम एकाच वेळी मिळत नाही, तर ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिली जाते

advertisement

Installment अंदाजित वेळ मिळणारी रक्कम
Step 1 (Advance) करारावर स्वाक्षरी झाल्यावर (लिलावानंतर लवकरच) 10% ते 15%
Step 2 (स्पर्धेदरम्यान) लीग सुरू झाल्यावर आणि लीगच्या मध्यात 50 % ते 60%
Step 3 (स्पर्धेनंतर) टूर्नामेंट यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर (३० दिवसांच्या आत) 20% ते 30%

advertisement

यामुळे, फ्रँचायझींनाही आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होते आणि खेळाडूंची बांधिलकी शेवटपर्यंत टिकून राहते. खेळाडू उपलब्ध नसेल तर...बोलीची रक्कम कापली जाण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे उपलब्धता (Availability) आणि फिटनेस (Fitness).

जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे (Injury) किंवा वैयक्तिक कारणांमुळे संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध नसेल, तर त्याला अनुपलब्ध असलेल्या दिवसांसाठीचा पगार (Salary) दिला जात नाही. उदाहरणार्थ, जर कॅमरन ग्रीनने फक्त अर्धीच स्पर्धा खेळला आणि उर्वरित स्पर्धेत तो अनफिट राहिला, तर फ्रँचायझी त्याला फक्त त्याने खेळलेल्या वेळेसाठीच पगार देण्यास बांधील असते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

थोडक्यात, IPL लिलावातील मोठी बोली ही खेळाडूची कमाल कमाई क्षमता दर्शवते. पण, कर, एजंट फी आणि लीगमध्ये त्याची उपलब्धता यावर अंतिम रक्कम ठरते.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction मध्ये खेळाडूवर लावलेली रक्कम त्यांना पूर्ण मिळते? जर नाही तर वरील पैशांचं काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल