दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्किया याने कटकमधल्या पहिल्या टी-20 सामन्यात दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे. जून 2024 नंतरचा नॉर्कियाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. पण त्याचं पुनरागमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याने त्याला सर्वाधिक फटके मारले. तसंच नॉर्किया दक्षिण आफ्रिकेचा सगळ्यात महागडा बॉलर ठरला. एनरिक नॉर्कियाने 10.25 च्या इकोनॉमी रेटने 4 ओव्हरमध्ये 41 रन दिल्या. पांड्याने नॉर्कियाविरुद्ध 220 च्या स्ट्राईक रेटने 22 रन काढल्या.
advertisement
2 कोटींची बेस प्राईज
आयपीएल 2026 च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या नॉर्कियाने त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. पण ज्या पद्धतीने त्याच्यावर आक्रमण केलं गेलं, ते पाहता फ्रँचायझींना त्याच्यात रस असण्याची शक्यता कमीच वाटते. पण लिलावाच्या आधी आणखी 2 सामने होणार आहेत, त्यामुळे नॉर्कियाला पुनरागमन करण्याची संधीही आहे.
