कुणाकडे सर्वात जास्त रक्कम?
सर्वाधिक रक्कम कोलकाता नाइट रायडर्सकडे असून, त्यांना 13 खेळाडू खरेदी करायचे आहेत. तर सर्वात कमी 2.75 कोटी इतकी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, ज्यामुळे त्यांना खूप विचारपूर्वक खरेदी करावी लागेल.
कधी आणि कुठे असेल ऑक्शन?
आयपीएल 2026 चा लिलाव मंगळवार, 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दुपारी अडीच वाजता हा लिलाव सुरू होईल. आयपीएल 2026 चा लिलाव अबू धाबी, यूएई येथे होत आहे. मागील दोन लिलाव भारताबाहेर जेद्दाह (2024) आणि दुबई (2023) येथेही झाले आहेत.
advertisement
कुठं लाईव्ह पाहता येईल ऑक्शन?
आयपीएल 2026 च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर होईल. आयपीएल 2026 चा लिलाव जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल, इथं तुम्ही लाईव्ह पाहू शकता.
कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी?
कोलकाता नाईट रायडर्स - 64.3 कोटी रुपये (13 जागा शिल्लक)
चेन्नई सुपर किंग्ज - 43.4 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)
गुजरात टायटन्स - 12.9 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
सनरायझर्स हैदराबाद - 25.5कोटी रुपये (10 जागा शिल्लक)
पंजाब किंग्ज - 11.5 कोटी रुपये (4 जागा शिल्लक)
लखनऊ सुपर जायंट्स - 22.95 कोटी रुपये (6 जागा शिल्लक)
दिल्ली कॅपिटल्स - 21.8 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
मुंबई इंडियन्स - 2.75 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - 16.4 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
राजस्थान रॉयल्स - 16.05 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)
