TRENDING:

IPL 2026 : भारताच्या ऑलराऊंडरची धोनीसारखी चतुर चाल, 21 इंटरनॅशनल मॅच खेळूनही लिलावात बनला अनकॅप्ड!

Last Updated:

आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. आयपीएल लिलावासाठी 1390 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं होतं, पण बीसीसीआयने यातल्या 245 भारतीय आणि 114 परदेशी खेळाडूंचं नाव शॉर्ट लिस्ट केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. आयपीएल लिलावासाठी 1390 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं होतं, पण बीसीसीआयने यातल्या 245 भारतीय आणि 114 परदेशी खेळाडूंचं नाव शॉर्ट लिस्ट केलं आहे, जे लिलावात सहभागी होतील. एकूण 359 खेळाडूंपैकी 244 खेळाडू हे अनकॅप्ड आहेत, पण टीम इंडियाच्या ऑलराऊंडरने स्वत:ची नोंद अनकॅप्ड भारतीय खेळाडू म्हणून केली आहे. भारताकडून 21 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेल्या या खेळाडूने धोनीसारखीच चतुर चाल खेळून स्वत:ची नोंद अनकॅप्ड भारतीय खेळाडू म्हणून केली आहे.
भारताच्या ऑलराऊंडरची धोनीसारखी चतुर चाल, 21 इंटरनॅशनल मॅच खेळूनही लिलावात बनला अनकॅप्ड!
भारताच्या ऑलराऊंडरची धोनीसारखी चतुर चाल, 21 इंटरनॅशनल मॅच खेळूनही लिलावात बनला अनकॅप्ड!
advertisement

विजय शंकर हा भारताकडून मार्च 2018 ते जून 2019 च्या दरम्यान 12 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, ज्यात इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपचाही समावेश आहे. तरीही विजय शंकर अनकॅप्ड भारतीय खेळाडू कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला, पण आयपीएलने मागच्या वर्षी केलेल्या एका नियमामुळे विजय शंकरला अनकॅप्ड खेळाडू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आयपीएल लिलावाच्या 5 वर्ष आधी भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय मॅच खेळला नसेल, तसंच त्याचं बीसीसीआयसोबत सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नसेल, तर त्याची नोंद अनकॅप्ड खेळाडू म्हणून होते.

advertisement

34 वर्षांच्या विजय शंकरने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2019 मध्ये खेळला होता, त्यामुळे तो लिलावात अनकॅप्ड खेळाडू म्हणून उतरेल. विजय शंकरच्या आधी एमएस धोनी आणि संदीप शर्मा यांनी या नियमाचा लाभ घेतला होता. विजय शंकर मागच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला होता. सीएसकेने त्याला 1.2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 5 सामन्यांमध्ये त्याने 129.67 च्या स्ट्राईक रेटने 118 रन केले. या कामगिरीनंतर त्याला सीएसकेने रिलीज केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI च्या बेसवर बनवलं जगातलं सर्वात लहान हवामान केंद्र,16 वर्षाच्या हितेनची कमाल
सर्व पहा

विजय शंकर त्याच्या आयपीएल करिअरमध्ये दिल्ली, हैदराबाद, गुजरात आणि सीएसकेसह चार वेगवेगळ्या टीमकडून खेळला आहे. त्याने 129.78 च्या स्ट्राईक रेटने 1233 रन केले आहेत, ज्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे, याशिवाय त्याने 9 विकेटही घेतल्या आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : भारताच्या ऑलराऊंडरची धोनीसारखी चतुर चाल, 21 इंटरनॅशनल मॅच खेळूनही लिलावात बनला अनकॅप्ड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल