सेनानायकेला अटक केल्यानंतर 2023 साली जामीन मिळाला होता, पण आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढणार आहेत. 40 वर्षीय सेनानायकेने 2012 ते 2016 पर्यंत श्रीलंकेसाठी 1 टेस्ट, 49 वनडे आणि 24 टी-20 मॅच खेळल्या, ज्यात त्याने 78 विकेट घेतल्या. सेनानायके 2014 सालच्या श्रीलंकेच्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. श्रीलंकेतील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार सेनानायकेने श्रीलंकेचा आणखी एक राष्ट्रीय खेळाडू थारिंडु रत्नायके याला मॅच फिक्सिंगसाठी संपर्क केला होता, जेव्हा तो कोलंबो किंग्सकडून खेळत होता.
advertisement
दुबईतून केला फोन
श्रीलंकेच्या 'डेली मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार सेनानायकेने 2020 साली एलपीएलमध्ये खेळणाऱ्या दोन क्रिकेटपटूंना दुबईहून फोन केला होता आणि त्यांना मॅच फिक्सिंग करण्याची ऑफर दिली.
KKR कडून खेळला सेनानायके
सचित्रा सेनानायके आयपीएल 2013 साली केकेआरकडून खेळला होता. आयपीएल 2013 च्या 8 सामन्यांमध्ये सेनानायकेने 9 विकेट घेतल्या होत्या, तसंच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सेनानायके सिडनी सिक्सर्सकडून खेळला, यातल्या 2 सामन्यांमध्ये त्याला 1 विकेट मिळाली.