खरं तर ऑस्ट्रेलियाला सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबे आणि आयर्लंड यांच्या विरूद्धच्या सामन्यातील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्याचा टॉस 2.30 वाजता होणार होता. पण तो अद्याप होऊ शकलेला नाही.कारण श्रीलंकेच्या पल्लीकेले स्टेडिअमवर पाऊस पडतो आहे.त्यामुळे सामना सूरू होण्यास उशीर होणार आहे. पण जर पाऊस असाच सूरू राहिला तर सामना रद्द करावा लागेल. या परिस्थितीत दोन्ही संघाना एक एक गुण दिले जाणार आहेत.अशाप्रकारे एक गुण मिळवून झिम्बाबे तीन सामन्यात 5 गूणांसह थेट सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. तर आयर्लंडचे 4 सामन्यात तीन गुण होणार आहेत त्यामुळे ते या स्पर्धेतून बाहेर होणार आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलियाचं काय होणार?
जर खरंच पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर ऑस्ट्रेलियाचा गेमच झाला म्हणायचं. कारण ऑस्ट्रेलियाचा सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबेचा आयर्लंडने पराभूत करणे आवश्यक आहे. यासह ऑस्ट्रेलियाला ओमान विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर झिम्बाबे सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सूरलेल्या आशा संपुष्ठात येणार आहेत.
ऑस्ट्रेलिया ओमान विरूद्ध शेवटचा सामना खेळेल,पण या सामन्यामुळे ते जास्तीत जास्त 4 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे या विजयाचा ऑस्ट्रेलियाला काहीच फायदा होणार नाही आहे आणि ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होणार आहेत.
दरम्यान अद्याप तरी सामना रद्द करण्यात आला नाही आहे. सुरूवातीला सामन्याचे काही ओव्हर घटवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही जर पाऊस सूरूच राहिला तर सामना रद्द होणार आहे.
