TRENDING:

Prithvi Shaw : 'केएलसोबत पृथ्वी शॉला खेळवलं तर...', इरफान पठाणने सांगितली दिल्लीची सर्वात मोठी ताकद! MI वरही पडू शकते भारी

Last Updated:

Irfan Pathan On Prithvi Shaw : महाराष्ट्र टीमकडून खेळताना त्याने 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये सर्वाधिक रन्स कुटले होते. आता पृथ्वी शॉ स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे पठाणने म्हटलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Irfan Pathan On Delhi Capitals Openers : आजपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरूवात होत आहे. पहिला सामना डिफेन्डिंग चॅम्पियन आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. या हंगामात 10 पैकी 9 टीम्स चर्चेत आहेत. पण एका टीमकडे कुणाचंच लक्ष नाही, ती टीम म्हणजे दिल्ली कॅपिटल्स... अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्लीची टीम यंदा आयपीएलच्या किताबासाठी लढणार आहे. त्याआधी आता दिल्लीच्या एका खेळाडूची चर्चा होतीये, ती म्हणजे पृथ्वी शॉ... पृथ्वी शॉ याच्या कामगिरीवर आता इरफाण पठाण याने मोठं वक्तव्य केलंय. दिल्लीचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
Irfan Pathan want Delhi Capitals should go with Prithvi Shaw
Irfan Pathan want Delhi Capitals should go with Prithvi Shaw
advertisement

नॅचरल गेमवर फोकस करणं गरजेचं - इरफान पठाण

ज्यावेळी एखादा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो खूप उत्साहात असतो, पण कधीकधी स्वतःवर परफॉर्मन्सचे जास्त ओझं घेतो. हे प्रेशर अपयशाकडे नेऊ शकते. त्यामुळे पृथ्वीने शांत राहून आपल्या नॅचरल गेमवर फोकस करणे गरजेचं आहे, असं इरफाण पठाण म्हणाला. गेल्या काही काळात पृथ्वीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. मात्र, अलीकडेच महाराष्ट्र टीमकडून खेळताना त्याने 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये सर्वाधिक रन्स कुटले होते. आता पृथ्वी शॉ स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे पठाणने म्हटलं आहे.

advertisement

IPL सुरू होण्याआधीच BCCI ची मोठी घोषणा! तब्बल 18 वर्षानंतर या ठिकाणी खेळणार टीम इंडिया! पण कॅप्टन कोण?

पृथ्वी शॉला संधी दिली पाहिजे - इरफान पठाण

दिल्ली कॅपिटल्सकडे अभिषेक पोरेल याच्या स्वरूपात एक पर्याय आहे. जो जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा खेळतो आणि संघाला चांगली सुरूवात करून देतोय. पण यावेळी पृथ्वी शॉला संधी दिली पाहिजे, असं इरफाण पठाण म्हणाला. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठीच्या आपल्या पहिल्याच हंगामात, शॉने सात सामन्यांत 537 धावा केल्या आणि त्यानंतर आपली हीच बहारदार कामगिरी त्याने सय्यद मुश्ताक अली करंडकातही कायम राखली. या 25 वर्षीय खेळाडूने सात सामन्यांत 183 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक-रेट 160 च्या किंचित वर होता.

advertisement

केएल राहुलचे कौतुक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, इरफान पठाणने आपल्या यूट्यूब चॅनेलवर केएल राहुलचे कौतुक केलं. स्ट्राइक रेटवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना तो म्हणाला, "केएल राहुल हा असा खेळाडू आहे जो प्रत्येक सीजनमध्ये 500 रन्स बनवण्याची क्षमता ठेवतो. तो टीमसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे. जोपर्यंत टीम मॅच जिंकतेय, तोपर्यंत त्याच्या स्ट्राइक रेटची चिंता करण्याची गरज नाही, कारण तो एक खरा मॅच-विनर आहे.", असं इरफान पठाण म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : 'केएलसोबत पृथ्वी शॉला खेळवलं तर...', इरफान पठाणने सांगितली दिल्लीची सर्वात मोठी ताकद! MI वरही पडू शकते भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल