हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादचा ईशान किशन आहे.ईशान किशन संध्या झारखंड संघाचा कर्णधार आहे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळतो आहे. या स्पर्धेत झारखंड आणि हरयाणा यांच्यात फायनल सामना सूरू आहे. या फायनल सामन्यात खेळताना ईशान किशनने वादळी खेळी केली आहे.
या सामन्यात झारखंड प्रथम फलंदाजीला उतरली होती. झारखंडकडून कर्णधार ईशान किशनने 49 बॉलमध्ये 101 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत. अशाप्रकारे त्याने 206 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे नुकताच लिलाव पार पडल्याने त्याची ही खेळी चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे ईशान किशनला सनरायझर्स हैदराबादने यावर्षी रिटेने केले आहेत.त्यामुळे यावर्षी तो काव्या मारनच्या ऑरेंज आर्मीसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे आयपीएल आधी ही त्याची खेळी पाहून संघ मालक प्रचंड खुश असेल.
सनरायझर्स हैदराबादचा संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अंसारी, शिवांग कुमार, सलिल अरोरा, साकिब हुसैन, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा, लियाम लिविंगस्टोन, शिवम मावी, जैक एडवर्ड्स
