बुमराहकडून मुलाला बॉलिंगचे धडे
टीम इंडियाचा घातक बॉलर जसप्रीत बुमराह २१ जानेवारीपासून पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ५ मॅचेसच्या टी२० सीरिजमध्ये तो पुनरागमन करणार आहे. ही सीरिज टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय टीमची 'ड्रेस रिहर्सल' मानली जात आहे. या मोठ्या मॅचपूर्वी बुमराहने आपली तयारी सुरू केली असून, यामध्ये त्याला त्याच्या अडीच वर्षांच्या मुलाची, अंगदची साथ मिळत आहे. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओत बुमराह आपल्या मुलाला बॉलिंगचे धडे देताना दिसत आहे.
advertisement
अंगद लुटूलुटू पळाला...
या क्यूट व्हिडिओमध्ये बुमराह ट्रेनिंग एरियात बॉलिंग करत असून, छोटा अंगद देखील आपल्या चिमुकल्या हातांनी बॉल फेकण्याचा प्रयत्न करत आहे. बुमराह स्टम्प्ससमोर बॉलिंग करत असताना अंगद तिथेच खेळत आहे आणि बुमराह त्याला बॉल कसा फेकायचा हे प्रेमाने समजावून सांगत आहे. बाप-लेकाच्या या सुंदर क्षणांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, चाहत्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंगद लुटूलुटू पळाला थोडा वेळ थांबला अन् स्टंपकडे त्याने बॉल फेकला.
वनडे सीरिजमधून आराम
जसप्रीत बुमराह शेवटचा साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सीरिजमध्ये खेळला होता. सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे सीरिजमधून त्याला आराम देण्यात आला आहे. टी२० वर्ल्ड कप आणि त्यानंतर होणाऱ्या आयपीएल (IPL) च्या व्यस्त वेळापत्रकापूर्वी खेळाडूंना फ्रेश राहता यावे, यासाठी बोर्डाने बुमराहला हा छोटा ब्रेक दिला होता. आता तो पूर्ण ताकदीनिशी न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सीरिजसाठी सज्ज झाला आहे.
