कागिसो रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून दक्षिण आफ्रिकेत परतण्यामागचं कारण सांगितले आहे. कागिसो रबाडावर ड्रग्जच्या वापरामुळे तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.रबाडाने कबूल केले की त्याने नियमांविरुद्ध असे काहीतरी वापरले होते. यामुळे त्याला क्रिकेटपासून तात्पुरते दूर राहावे लागेल. त्याने याबद्दल माफीही मागितली आहे.
रबाडाच्या निवेदनात काय?
कागिसो रबाडा यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की,'जसे वृत्त आहे की, मी अलीकडेच वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या मध्यभागी दक्षिण आफ्रिकेला परतलो. माझ्या तपासणीत एका ड्रग्जचा प्रतिकूल परिणाम दिसून आला म्हणून हे घडले. ज्यांना मी निराश केले आहे त्यांच्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. क्रिकेट खेळण्याचा विशेषाधिकार मी कधीही हलक्यात घेणार नाही. हा विशेषाधिकार माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तो माझ्या वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे आहे.'
advertisement
रबाडाने त्याच्या कठीण काळात त्याला साथ देणाऱ्यांचेही आभार मानले. तो म्हणाला, 'मी माझ्या एजंट, क्रिकेट साउथ आफ्रिका आणि गुजरात टायटन्स यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन आणि माझ्या कायदेशीर टीमचे त्यांच्या मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या मित्रांचे आणि कुटुंबाचे त्यांच्या समजूतदारपणा आणि प्रेमाबद्दल आभार मानू इच्छितो.'